राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रथम पदार्पण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:12 IST2021-09-13T04:12:15+5:302021-09-13T04:12:15+5:30

तिवसा : तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथे यंदाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रथम आगमनाप्रीत्यर्थ ‘प्रथम पदार्पण सोहळा’ स्थानिक राष्ट्रसंत चौकात ...

Rashtrasant Tukadoji Maharaj First Debut Ceremony | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रथम पदार्पण सोहळा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रथम पदार्पण सोहळा

तिवसा : तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथे यंदाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रथम आगमनाप्रीत्यर्थ ‘प्रथम पदार्पण सोहळा’ स्थानिक राष्ट्रसंत चौकात कोरोना नियमांचे पालन करून विविध विधायक कार्यक्रमांनी पार पडला. खासदार नवनीत राणा या सोहळ्याला उपस्थित होत्या.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ३ सप्टेंबर १९३० रोजी मोझरी येथे श्रीमंत दानशूर रावसाहेब ठाकूर यांच्या वाड्यात प्रथम आगमन झाले होते. त्याप्रीत्यर्थ हा ‘प्रथम आगमन सोहळा’ दरवर्षी साजरा केला जातो. यानिमित्त येथील राष्ट्रसंत चौकात ग्रामपंचायत सदस्य संजय लांडे यांच्या हस्ते तीर्थस्थापना करण्यात आली. १ ते ३ सप्टेंबर दरम्यान खंजिरी भजन, सामुदायिक ध्यान, प्रार्थना, प्रवचन आदी कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी डॉ. चौधरी, मनोहरराव वाघ, ग्रामगीताचार्य मालती गहुकर, जयश्री घुडजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी निर्मला उमप, संतोष पाचघरे, मंजुळामाता महिला मंडळाच्या कार्यकर्त्या व श्री गुरुदेव भक्तांनी सहकार्य केले.

Web Title: Rashtrasant Tukadoji Maharaj First Debut Ceremony