लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नवीन वर्षात म्हणजेच सन २०२६ मध्ये खगोलीय घटनांची रेलचेल राहणार आहे. यामध्ये ३ जानेवारीला सुपरमून दिसेल तर १० जानेवारीला गुरू पृथ्वीच्या जवळ राहणार असल्याचे खगोलतज्ज्ञांनी सांगितले.
३ जानेवारीला पृथ्वीपासून चंद्राचे अंतर कमी राहील. त्यामुळे चंद्र या दिवशी मोठा व प्रकाशमान दिसेल. सरासरी पृथ्वी-चंद्र हे अंतर ३.८५ लाख कि.मी. असते. जेव्हा पृथ्वी-चंद्र हे अंतर ३.७० लाख कि.मी.च्या आत असते. त्याला सुपरमून असे म्हणतात.
चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने समुद्राच्या भरती-ओहोटीची तीव्रता वाढणे, वादळ यासारख्या घटना घडू शकतात. पृथ्वीवरून आपण नेहमी चंद्राचा ५९ टक्के भाग पाहता येतो. चंद्रावरून पृथ्वी ही ९८.४ टक्के दिसू शकते. चंद्रावरून पृथ्वीवर प्रकाशकिरण येण्यास १.३ सेकंद लागतात.
चंद्राचे वय हे ४.६५ अब्ज वर्ष आहे. चंद्र हा पृथ्वीपासून दरवर्षाला ३.८ सेंटीमीटर लांब जात आहे. त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी होईल व १०० वर्षांनी दिवस हा २ मिली सेकंदने मोठा होईल. चंद्रावर ३० हजार विवरे व १२ पर्वत आहे. पर्वत व विवरे दुर्बिनीमधून अगदी चांगल्या प्रकारे पाहता येतात. अगदी साध्या डोळ्यांनी हा सूपरमून खगोलप्रेमींनी व जिज्ञासूंनी अवश्य बघावा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे.
सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह गुरू
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू हा १० जानेवारीला अगदी सूर्यासमोर येत आहे. या घटनेला खगोलशास्त्रात 'प्रतियुती' म्हणतात. या काळात ग्रहाचे पृथ्वीपासूनचे अंतर हे सरासरी कमी असते. गुरूच्या लागोपाठ प्रतियुतीमधील काळ हा साधारण तेरा महिन्यांचा असतो. याआधी दि. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी गुरू-सूर्य प्रतियुती झाली होती.
गुरूवर जीवसृष्टी असल्याचा पुरावा नाही
पृथ्वीपासून गुरूचे सरासरी अंतर हे ९३ कोटी किमी व गुरूचा व्यास १,४२,८०० किमी आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक चक्कर मारण्यास ११.८६ वर्ष लागतात. गुरूला ७९ चंद्र आहे. ७ डिसेंबर १९९५ रोजी मानवरहित यान 'गॅलिलिओ' गुरूवर पोहोचले. गुरूवर जीवसृष्टी असल्याचा कोणताही पुरावा अजूनपर्यंत मिळाला नाही.
Web Summary : In 2026, a supermoon will appear on January 3rd. Jupiter will be closest to Earth on January 10th. The distance between Earth and the moon will be minimal, making it appear larger. Jupiter will be in opposition, offering a closer view.
Web Summary : 2026 में, 3 जनवरी को सुपरमून दिखाई देगा। 10 जनवरी को बृहस्पति पृथ्वी के सबसे करीब होगा। पृथ्वी और चंद्रमा के बीच की दूरी कम होगी, जिससे यह बड़ा दिखाई देगा। बृहस्पति प्रति-युति में होगा, जिससे नज़दीकी दृश्य दिखाई देगा।