नरपशुंचा धोका, 'ती' कुलूपबंद !

By Admin | Updated: December 15, 2014 22:47 IST2014-12-15T22:47:29+5:302014-12-15T22:47:29+5:30

मानवी विकृतींच्या जबड्यात सापडलेल्या एका जखमी महिलेचा इर्विनमध्ये उपचार सुरु होता, मात्र तेथेही त्या पीडित महिलेला विकृतांचा सामना करावा लागल्याने अखेर त्या महिलेला कुलूपबंद खोलीत ठेवण्यात आले.

Rape threat, 'she' locked! | नरपशुंचा धोका, 'ती' कुलूपबंद !

नरपशुंचा धोका, 'ती' कुलूपबंद !

परिचारिकेची धडपड : महिला सुधार समितीने पुढाकार घेण्याचे आवाहन
वैभव बाबरेकर - अमरावती
मानवी विकृतींच्या जबड्यात सापडलेल्या एका जखमी महिलेचा इर्विनमध्ये उपचार सुरु होता, मात्र तेथेही त्या पीडित महिलेला विकृतांचा सामना करावा लागल्याने अखेर त्या महिलेला कुलूपबंद खोलीत ठेवण्यात आले. त्या महिलेची अद्यापर्यंत ओळख न पटल्याने परिचारीकेनेच आईच्या माया देत तीला आरोग्य सेवा पुरविली. गेल्या दीड महिन्यांपासून तिच्यावर उपचार सुरु असून सद्यस्थितीत ती पूर्णपणे बरी झाली आहे. मात्र तिच्या पुढील जीवनात पुन्हा मानवी विकृतांशी सामना होऊ नये याकरिता तिची ओळख पटविण्यासाठी परिचारिका धडपड करीत आहे.
फ्रेजरपुरा परिसरातील सरदार चौकात ९ आॅक्टोबर ३० ते ३५ वयोगटातील अनोळखी महिला अत्यवस्थेत आढळून आली. तिला एका सामाजिक कार्यकत्याने सामाजिक बांधीलकीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Rape threat, 'she' locked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.