अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:13 IST2021-05-27T04:13:47+5:302021-05-27T04:13:47+5:30
0000000000000000000000000 संशयित फिरणाऱ्या तरुणाला अटक अमरावती : संशयितरीत्या फिरणाऱ्या एका तरुणाला बडनेरा पोलिसांनी मंगळवारी छत्री चौकातील दारू दुकानाजवळून ताब्यात ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग
0000000000000000000000000
संशयित फिरणाऱ्या तरुणाला अटक
अमरावती : संशयितरीत्या फिरणाऱ्या एका तरुणाला बडनेरा पोलिसांनी मंगळवारी छत्री चौकातील दारू दुकानाजवळून ताब्यात घेतले. शेख तौसीफ शेख शकुर (२० रा. आदिवासीनगर) असे आरोपीचे नाव आहे. एएसआय गजानन बोरवार यांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना, आरोपी शेख तौसीफ संशयितरीत्या फिरताना दिसला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुध्द कलम १२२ अन्वये गुन्हा नोंदविला.
0000000000000000000000000000
तीन जुगार अड्ड्यावर धाडी
अमरावती : शहर पोलिसांनी मंगळवारी विविध ठिकाणच्या तीन जुगार अड्ड्यावर धाड टाकून आरोपींजवळील मुद्देमाल जप्त केला. बडनेरा पोलिसांनी संजय बाळकृष्ण कांबळे (५० रा. पाचबंगला, बडनेरा), रवी रुपराव मेश्राम (२३ रा. बारीपुरा, बडनेरा) व रुपराव पुंडलिक वरखडे (रा. दाभा) याच्या ताब्यातून वरली-मटक्याचे साहित्य जप्त केले. नागपुरी गेट पोलिसांनी भारत भगवानदास केमे(४३ रा. मसानगंज) याच्या ताब्यातून ३३० रुपयांचे साहित्य जप्त केले.
000000000000000000000
तीन अवैध दारू विक्रेत्यांना अटक
अमरावती : शहर पोलिसांनी मंगळवारी तीन अवैध दारू विक्रेत्यांना अटक करून हजारो रुपयांची दारू जप्त केली. बडनेरा पोलिसांनी आठवडी बाजारात धाड टाकून अफरोज खान मन्नान खान (२७ रा. इंदिरानगर, बडनेरा) व कैलास प्रल्हादराव हिवराळे (२४ रा. पाचबंगला, बडनेरा) यांच्या ताब्यातून अवैध दारू जप्त केली. राजापेठ पोलिसांनी दशरथ रामदास रायचंद व सुनील चंपतराव डोळे (दोन्ही रा. जेवडनगर) यांच्या ताब्यातून १ हजार १४० रुपयांची दारू जप्त केली.
00000000000000000000000000
महिलेची गळफास लावून आत्महत्या
अमरावती : एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रमाबाई आंबेडकर नगरात उघडकीस आली. दीपक रमेशराव साबळे यांच्या माहितीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक आर.आर. जढाळे यांनी केला.