मनोरुग्ण मुलीवर बलात्कार, ५ वर्षांची सक्तमजुरी
By Admin | Updated: July 21, 2014 23:37 IST2014-07-21T23:37:12+5:302014-07-21T23:37:12+5:30
खरबी (मांडवगड) गावातील एका मनोरुग्ण मुलीवर बलात्कारप्रकरणी सोमवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालय क्र. १ ने आरोपीला ५ वर्षांच्या सक्तमजुरी शिक्षा ठोठावली आहे. मिलिंद महादेव बनसोड (३६,रा.खरबी, मांडवगड)

मनोरुग्ण मुलीवर बलात्कार, ५ वर्षांची सक्तमजुरी
खरबी येथील घटना : २१ हजार रुपयांचा दंड
अमरावती : खरबी (मांडवगड) गावातील एका मनोरुग्ण मुलीवर बलात्कारप्रकरणी सोमवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालय क्र. १ ने आरोपीला ५ वर्षांच्या सक्तमजुरी शिक्षा ठोठावली आहे. मिलिंद महादेव बनसोड (३६,रा.खरबी, मांडवगड) याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत न्यायालयात दाखल दोषारोपपत्रानुसार, खरबी गावातील एक २८ वर्षीय मनोरुग्ण तरुणी २९ आॅगस्ट २०११ रोजी गावाबाहेर शौचास गेली होती.
यावेळी तिचा पाठलाग करीत गावातील आरोपी मिलिंद बनसोड हा लगट साधण्याच्या बेताने तिच्याजवळ गेला होता.
पीडित मुलीला मदतीचा निर्णय
आरोपीने त्या मनोरुग्ण तरुणीवर अतिप्रसंग केल्याचे गावातीलच रहिवासी चंदा सोनोने व शांता मानकर या दोन्ही महिलांनी पाहिले. त्यांनी तत्काळ गावाकडे धाव घेऊन या घटनेची माहिती पीडित मुलीचा भाऊ मनोहर रामचंद्र बावने याना दिली. पीडित मुलीच्या भावाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी त्यांच्यासोबत अन्य गावकऱ्यांची उपस्थिती होती. मनोरुग्ण बहिणीवर अत्याचार होत असल्याचे दृष्य पाहून मनोहर यांनी आरोपीला चोप देण्यात आला. या घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील यांना देण्यात आल्यावर त्यांनी तळेगाव दशासर पोलिसांना ही माहिती दिली व आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपी मिलींद बनसोडविरुध्द भादंवीच्या कलम ३७६, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. याप्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी सुधाकर इंगळे यांनी करुन दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले. पीडित मुलगी मानसिक आजारी असल्याची शहानिशा न्यायालयाने केली. याप्रकरणी सात साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकून सोमवारी दुपारी न्मिलींद बनसोड याच्यांविरुध्द शिक्षेची तरतुद केली. जिल्हा व सत्र न्यायाधिश क्र.१ चे एस.एल.आणेकर यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायालयाने आरोपीला ५ वर्षांची सक्तमजुरी व २१ हजारांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास आरोपीला सहा महिने अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. ठोठावण्यात आलेल्या २१ हजारांच्या दंडापैकी २० हजार रुपये पीडित मुलीला देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. सरकारी पक्षाची बाजू अॅड. सुनील देशमुख यांनी सांभाळली. (प्रतिनिधी)