मुलींच्या विक्री प्रकरणात बलात्काराचा गुन्हा

By Admin | Updated: February 3, 2016 00:19 IST2016-02-03T00:19:08+5:302016-02-03T00:19:08+5:30

शिरपूर येथील अल्पवयीन मुलीच्या विक्री प्रकरणात बलात्कार व बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Rape of girl child in case of rape | मुलींच्या विक्री प्रकरणात बलात्काराचा गुन्हा

मुलींच्या विक्री प्रकरणात बलात्काराचा गुन्हा

कार जप्त : पाच जण पोलिसांच्या ताब्यात
धारणी : शिरपूर येथील अल्पवयीन मुलीच्या विक्री प्रकरणात बलात्कार व बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. २७ जानेवारी रोजी शिरपूर येथील तंटामुक्ती समिती सदस्य आणि पीपल आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मध्यप्रदेशातील दोन पती पत्नीसह गावातील तीन मुलींच्या पालकांसह ५ लोकांना पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या प्रकरणात एक कारसुद्धा जप्त करण्यात आली आहे.
३० जानेवारी रोजी अल्पवयीन मुलींसोबत लग्न लावणाऱ्या गोपाल पाटीदार व त्याचा थोरला भाऊ दिनेश याला अटक करून त्यांचेवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यासह अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेण्याचाही आरोप ठेवण्यात आला होता. ‘त्या’ अल्पवयीन मुलीचे वैद्यकिय तपासणीनंतर तिचेसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे सिद्ध होताच पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध काल १ फेब्रुवारी रोजी बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत वाढीव गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
मेळघाटातील भोळ्याभाबड्या आदिवासी गरिबांना आर्थिक प्रलोभन देऊन परप्रांतातील लोक स्थानिक दलालांना हाताशी धरून मुलींचे खरेदी करून त्यांचे शोषण करीत असतात. हा प्रकार नित्याचाच होता. मात्र आता आदिवासी बांधवांत जागरुकता वाढल्याने, युवकांनी पुढाकार घेतल्याने असे प्रकार उघडकीस येत आहेत.
शिरपूर येथील प्रकरणात आतापर्यंत ७ आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची नावे रामावतार मालवीय, संगीता मालवीय, जयराम दारसिंबे, फुलकई दारसिंबे, रमेश भिलावेकर, गोपाल पाटीदार व दिनेश पाटीदार अशी आहेत. प्रकरणाचा पुढील तपासी एपीआय सुधाकर चव्हाण एपीआय प्रीती ताठे करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Rape of girl child in case of rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.