रावसाहेब शेखावतांचा निर्णय अंतिम

By Admin | Updated: February 8, 2016 00:25 IST2016-02-08T00:25:24+5:302016-02-08T00:25:24+5:30

स्थायी समितीत नगरसेवकांची नियुक्ती करण्यासाठी गटनेत्यांचे पत्र आवश्यक आहे. गटनेत्यांनी पत्र दिल्यानुसार सर्वसाधारण सभेत महापौर या नावांची घोषणा करुन नियुक्ती करतात.

Raosaheb Shekhawat's decision final | रावसाहेब शेखावतांचा निर्णय अंतिम

रावसाहेब शेखावतांचा निर्णय अंतिम


अमरावती : स्थायी समितीत नगरसेवकांची नियुक्ती करण्यासाठी गटनेत्यांचे पत्र आवश्यक आहे. गटनेत्यांनी पत्र दिल्यानुसार सर्वसाधारण सभेत महापौर या नावांची घोषणा करुन नियुक्ती करतात. स्थायी समिती ही मलईदार असल्यामुळे बहुतांश नगरसेवक या समितीत प्रवेशासाठी जीवाचे रान करीत असल्याचे चित्र आहे. काँग्रेसमध्ये स्थायी समितीत सदस्य म्हणून प्रवेशासाठी जंबो यादी आहे. पक्षनेता बबलू शेखावत यांच्या दालनात स्थायी समितीत प्रवेशासाठी दरदिवसाला नगरसेवकांचा ठिय्या असल्याचे दिसून येते. काँग्रेसमधून स्थायी समितीत सदस्य म्हणून माजी आ. रावसाहेब शेखावत यांचा निर्णय अंतिम राहील, अशी माहिती आहे. हल्ली काँग्रेसमधून नियमानुसार सभापती विलास इंगोले व योजना रेवस्कर हे दोन सदस्य बाहेर पडतील. मात्र, काँग्रेसमध्ये स्थायी समितीत सदस्य नियुक्तीसाठी ८ ते १० जण इच्छुक आहेत. हिच परिस्थिती राष्ट्रवादी फ्रंटमध्ये असून वंदना हरणे, सारिका महल्ले हे दोन सदस्य बाहेर पडणार आहेत. परंतु राष्ट्रवादी फ्रंटमधून नव्याने पाच ते सहा नगरसेवक स्थायी समितीत नियुक्तीसाठी संजय खोडके यांच्याकडे लॉबिंग करीत आहेत.

Web Title: Raosaheb Shekhawat's decision final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.