लुटमारीसाठीच हत्या ?

By Admin | Updated: October 9, 2016 01:06 IST2016-10-09T01:06:10+5:302016-10-09T01:06:10+5:30

१४ दिवसांपूर्वी अंजनगाव तालुक्यातील चिंचोलीच्या युवकाचा गळा चिरून निर्घृन हत्या केल्याची...

Ransacked for the murder? | लुटमारीसाठीच हत्या ?

लुटमारीसाठीच हत्या ?

 अमर साबळे हत्याप्रकरण : चार आरोपींना पोलीस कोठडी, आरोपीचा शोध
दर्यापूर : १४ दिवसांपूर्वी अंजनगाव तालुक्यातील चिंचोलीच्या युवकाचा गळा चिरून निर्घृन हत्या केल्याची घटना लेहगाव रेल्वे-अंजनगाव मार्गावर घडली. याचे धागेदोरे दर्यापूर पोलिसांना गवसले. घटनेतील पाच आरोपींना अटक केली होती. पण एक आरोपी पोलीस तपासादरम्यान पळून गेल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चार आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना १३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. लुटमारीच्या उद्देशाने ही हत्या केल्याची बाब तपासात उघड झाली आहे.
मृत अमरचे व त्याच्या वडिलाचे दोन लग्न झाल्याने व संपूर्ण कुटुंबाचा इतिहास गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे कौटुंबिक वादातून तर हे प्रकरण घडले नसावे. या दिशेने पोलिसांनी तपास केला. परंतु तपासामध्ये अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याने काही धागे उलगडले. यामध्ये गुरुवारी दर्यापूर पोलिसांच्या पथकाने महेंद्रसिंग गोपालसिंग राजपूत, गणेशसिंग हनियासिंग राजपूत (२७) सोहनसिंग ईश्वरसिंग राजपूत, (रा. जळम, नटवर कैलाशसिंग तंवर रा लेहगाव रेल्वे यांना अटक केली. परंतु तपास सुरु असतानाच महेंद्रसिंग गोपालसिंग राजपूत रा. उमाळी ता. मलकापूर, हा आरोपी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातून पळाला. त्याचा शोध घेत असतानाच शुक्रवारी घटनेतील मुख्य आरोपी कपिल तंवरला पोलिसांनी मूर्तिजापूर रेल्वेस्टेशवरुन रात्री अटक केली. घटनेच्या दिवशी लुटमारीच्या उद्देशाने या आरोपींतानी संगनमताने दुचाकीवरून धारदार भाल्याने हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले.ईतर आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

कपिल तंवर सराईत गुन्हेगार
या घटनेतील पकडण्यात आलेला मुख्य आरोपी कपिल कैलाशसिंग तंवर हा सराईत गुन्हेगार असल्याने पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. त्याच्या विरु द्ध यापूर्वीही कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल आहे. तसेच लेहगांव येथे त्याच्या घरी अवैध दारुचा व्यवसायही करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. अमर हा मद्यप्राशान करण्यासाठी कधीकधी लेहगांव रेल्वे येथे जात होता. त्यामुळे मृताची आरोपीशी तोंड ओळख असल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

गुन्हेगारांची अमरावती कारागृहात भेट
या घटनेतील अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींची ओळख ते विविध गुन्ह्यात अटक असताना अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात काही महिन्यांपूर्वी झाली होती. येथूनच लुटमारीच्या घटनेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.

तपास सुरू आहे. पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. चार आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फरार आरोपीचा शोध सुरू आहे. लुटमारीच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शीने तपासात पुढे आले आहे. लवकरच याचे कारण पुढे येईल.
- सचिन हिरे,
उपविभागीय पोलीस अधिकारी, दर्यापूर

Web Title: Ransacked for the murder?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.