रंगपंचमीचा सण जाणार अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:07 IST2021-03-29T04:07:35+5:302021-03-29T04:07:35+5:30

महापालिकेच्या बजेटमत्ये सत्ताधारी भाजपक्षाने मोठ-मोठ्या घोषणा केल्यात. कोट्यवधी रुपयांच्या निधीची कामे बजेटमध्ये दाखविली. परंतु, महापालिकेचे उत्पन्न तोकडे असल्यामुळे या ...

Rangpanchami festival will go in the dark | रंगपंचमीचा सण जाणार अंधारात

रंगपंचमीचा सण जाणार अंधारात

महापालिकेच्या बजेटमत्ये सत्ताधारी भाजपक्षाने मोठ-मोठ्या घोषणा केल्यात. कोट्यवधी रुपयांच्या निधीची कामे बजेटमध्ये दाखविली. परंतु, महापालिकेचे उत्पन्न तोकडे असल्यामुळे या सर्व योजना प्रत्यक्षात आणने अशक्य आहे. याचे जागते उदाहरण म्हणजे सर्वसाधारण स्ट्रीट लाईट दुरुस्तीचे काम गत सात ते आठ महिन्यांपासून देयके अदा न केल्यामुळे बंद करण्यात आलेले आहे. यावरून महापालिका प्रशासनाला जनतेच्या समस्याशी काही देणे-घेणे नसल्याचे स्पष्ट होत आहे. केवळ मोठी स्वप्ने दाखविण्यातच प्राशासन धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे. येत्या दोन दिवसांत ईईएसएल कंपनीने स्ट्रीट लाईटचे काम सुरू न केल्यास महापालिकेत काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येईल, असे अमरावती शहर काँग्रेस अध्यक्ष तथा महापालिका विरोधी पक्षनेता बबलू शेखावत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Rangpanchami festival will go in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.