चिखलदरा-मेळघाट पर्यटन महोत्सवाची १२ पासून रंगत

By Admin | Updated: January 6, 2017 00:31 IST2017-01-06T00:31:20+5:302017-01-06T00:31:20+5:30

विदर्भाचे नंदनवन चिखलदरा या पर्यटनस्थळी दरवर्षी साजरा होणारा पर्यटन महोत्सव आता चिखलदरा- मेळघाट पर्यटन महोत्सव यानावाने

Ranged from 12 to Chikhaldara-Melghat Festival | चिखलदरा-मेळघाट पर्यटन महोत्सवाची १२ पासून रंगत

चिखलदरा-मेळघाट पर्यटन महोत्सवाची १२ पासून रंगत

पालकमंत्र्यांनी घेतला आढावा : देशभरातील पर्यटकांसाठी मनोरंजन, खवय्येगिरीवर भर
नरेंद्र जावरे  चिखलदरा
विदर्भाचे नंदनवन चिखलदरा या पर्यटनस्थळी दरवर्षी साजरा होणारा पर्यटन महोत्सव आता चिखलदरा- मेळघाट पर्यटन महोत्सव यानावाने आठवडाभर साजरा करण्यात येणार असून आदिवासी संस्कृतीचे दर्शन या महोत्सवातून घडविले जाणार आहे. या पर्यटनमहोत्सवाचा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी मंगळवारी आढावा घेतला.
या महोत्सवामध्ये लावणी, आदिवासी नृत्य स्पर्धा, साहसी उपक्रमांसह विविध कार्यक्रमांची मेजवानी पर्यटकांना मिळेल. १२ ते १८ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या महोत्सवाची पहिली बैठक पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी पार पडली. बैठकीला जिल्हाधिकारी किरण गित्ते, मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी, प्रवीण येवतीकर, अरुण तायडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भावे, परिवहन विभागाचे मार्तंड नेवास्कर, राजेश मांगलेकर, वेदांत सुरपाटणे आदींची उपस्थिती होती. महोत्सवात सात दिवस मराठमोळी लावणी तर आदिवासी नृत्य स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्र्यांकडून तीन बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
सोबतच दरवर्षीप्रमाणे विविध पॉर्इंटवर साहसी उपक्रम व पुणे-मुंबई येथील लोकप्रिय कार्यक्रमांची मेजवानी देखील या महोत्सवातून उपलब्ध करून दिली जाईल. पर्यटकांना रिझविण्यावर या महोत्सवांतर्गत अधिकाधिक भर दिला जाईल. त्यानुसार महोत्सवातील कार्यक्रमांची आखणी करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी यावेळी दिल्या. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी महोत्सवासाठी निधीची कमतरता नसून योग्य नियोजन करण्याचे सांगितले.

 

Web Title: Ranged from 12 to Chikhaldara-Melghat Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.