राणा लॅण्डमार्कच्या व्यवस्थापकीय संचालकाला २९ पर्यंत कोठडी

By Admin | Updated: March 23, 2016 00:26 IST2016-03-23T00:26:50+5:302016-03-23T00:26:50+5:30

स्वस्त दरात घरकुलाचे स्वप्न दाखविणाऱ्या राणा लॅण्डमार्क कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकास न्यायालयाने २९ मार्चपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Rana Landmark Managing Director | राणा लॅण्डमार्कच्या व्यवस्थापकीय संचालकाला २९ पर्यंत कोठडी

राणा लॅण्डमार्कच्या व्यवस्थापकीय संचालकाला २९ पर्यंत कोठडी

अमरावती : स्वस्त दरात घरकुलाचे स्वप्न दाखविणाऱ्या राणा लॅण्डमार्क कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकास न्यायालयाने २९ मार्चपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी आरोपी अभय शिरभातेला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
राणा लॅण्डमार्क कंपनीने फ्लॅट बुकिंगच्या नावाने ६०० नागरिकांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले होते. याप्रकरणात पोलिसांनी योगेश राणा व शशिकांत जीचकारला अटक केली होती. मात्र, व्यवस्थापकीय संचालक अभय शिरभाते हा दीड वर्षांपासून पसार होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो पोलिसांच्या हाती लागला नाही, मात्र, अखेर सोमवारी अभय शिरभातेला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी अभयची चौकशी केली असता त्यांच्याजवळ संपत्ती नसल्याचे निदर्शनास आले. मात्र, अभय शिरभाते राणा लॅण्डमार्कमध्ये नोकरी करताना कंपनीकडून त्याला महागडे चारचाकी वाहन बक्षीस म्हणून देण्यात आले आहे, ते वाहन अभयने दर्यापूर येथील एका व्यक्तीला विकली आहे. ते वाहन आर्थिक गुन्हे शाखा जप्त करणार आहे. तसेच अभयची संपत्ती कोठे-कोठे आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Web Title: Rana Landmark Managing Director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.