रॅलीच्या वादातून मारहाण

By Admin | Updated: April 16, 2016 00:13 IST2016-04-16T00:13:40+5:302016-04-16T00:13:40+5:30

रॅलीच्या वादातून लाथाबुक्यांनी, व नाकावर चावी मारून जखमी केल्याची घटना गुरुवारी रात्री १०.३० वाजतादरम्यान तालुक्यातील नांदेड बु । येथे घडली.

Rally wins | रॅलीच्या वादातून मारहाण

रॅलीच्या वादातून मारहाण

गुन्हा दाखल : नांदेड बु. येथील घटना
दर्यापूर : रॅलीच्या वादातून लाथाबुक्यांनी, व नाकावर चावी मारून जखमी केल्याची घटना गुरुवारी रात्री १०.३० वाजतादरम्यान तालुक्यातील नांदेड बु । येथे घडली.
निखिल सिध्दार्थ चक्रे असे जखमीचे नाव असून आरोपी अमोल भोंगळे, अविनाश भोंगळे, अजय भोंगळे सर्व रा. नांदेड बु। यांनी संगनमत करून फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण कक्रून नाकावर चावी मारुन जखमी केले. डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गावात रॅली काढण्यात आली होती. रॅलीची वेळ संपली असतानाही ते सुरूच ठेवण्यासाठी आरोपींनी फिर्यादीसोबत वाद घातला. यानंतर आरोपीने फिर्यादीच्या घरात शिरून मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे गावात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. आरोपी विरुद्ध पोलिसांनी भादंविच्या कलम ३२४, ४५२, ३४ नुसार गुन्हा नोंदविला आहे. या क्षुल्लक वादाने गावात तणाव निर्माण झाला असताना उपस्थित ग्रामस्थांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचली नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Rally wins