साहस जनहितकारी संस्थेच्या नारीशक्ती फाउंडेशनचा उपक्रम
चांदूर रेल्वे : स्थानिक अशोक महाविद्यालयात रक्षाबंधन सोहळ्यातून कोविड काळात झटणाऱ्या कोरोनायोद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. साहस नारीशक्ती फाउंडेशनने हा उपक्रम पार पाडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेखा औंधकर होत्या. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल मरसकोल्हे, डॉ. क्रांतीसागर ढोले, डॉ. भेंडकर, डॉ. मुदस्सिर, डॉ. अविनाश ठाकरे, डॉ. पल्लवी तारे, डॉ. उमप, अमित बेलसरे, डॉ. संकेत शेळके, डॉ. सागर वाघ, पूर्ती लाखोडे, पोलीस अधिकारी गणेश मुपडे, पोलीस कर्मचारी जगदीश राठोड, महेश प्रसाद, अरुण भुरकाडे, राहुल वानखडे, रवींद्र मेंढे, विवेक राऊत, बंडू आठवले, निशिकांत देशमुख, नगर परिषद कर्मचारी महेश राऊत, इंद्रजित गोंडाणे व ॲॅम्ब्यूलन्स चालक विनोद शिवणकर, प्रमोद चौधरी तसेच वॉटरमॅन विवेक चर्जन, साजिद जानवनी, पप्पी पटले, सौरभ इंगळे, प्रवीण श्रीखंडे, रोहित इंगोले, शंतनु कदम, संकेत मोहोळ, अमित पेठे यांचा शाल, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व प्रमाणपत्र
देऊन सन्मान करण्यात आला. सुलोचना राऊत, चेतन भोले यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालन खुशी रायकवार व प्रेमचंद अंबादे यांनी केले.
250821\5623img-20210825-wa0009.jpg
photo