राजापेठ स्पोर्टिंग क्लबने दिली धार्मिकतेला क्रीडा, सामाजिकतेची झालर
By Admin | Updated: September 2, 2014 23:23 IST2014-09-02T23:23:17+5:302014-09-02T23:23:17+5:30
गेली २९ वर्षे गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करणाऱ्या राजापेठ स्पोर्टिंग क्लबने धार्मिक कार्याला क्रीडा व सामाजिक कार्याची जोड दिली आहे. या मंडळातर्फे वर्षभर क्रीडा स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबिर

राजापेठ स्पोर्टिंग क्लबने दिली धार्मिकतेला क्रीडा, सामाजिकतेची झालर
अमरावती : गेली २९ वर्षे गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करणाऱ्या राजापेठ स्पोर्टिंग क्लबने धार्मिक कार्याला क्रीडा व सामाजिक कार्याची जोड दिली आहे. या मंडळातर्फे वर्षभर क्रीडा स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबिर व समाज प्रबोधनाचे कार्य केले जाते. दोन वर्षांत या मंडळाचे सुमारे ६५ खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर झळकले आहेत. यावेळी मंडळाने शिर्डीच्या साई दर्शनाचा देखावा साकारला असून या देखाव्याचे उद्घाटन शिर्डी संस्थानचे विश्वस्त गोपीनाथ अण्णा कोते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
येथील राजापेठ स्पोर्टिंग क्लब दरवर्षी गणेशोत्सवासह सामाजिक, क्रीडा व आरोग्य क्षेत्रातही वर्षभर सक्रिय राहते.
दरवर्षी मंडळाच्यावतीने ग्रीष्मकालीन क्रीडा शिबिराचे आयोजन केले जाते. यात खो-खो, क्रिकेट व कबड्डी स्पर्धा व प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. दोन वर्षांत मंडळाचे ६० ते ७० खेळाडून राज्य व राष्ट्रीय स्तरावर झळकले आहेत. याच मंडळाचा राहुल चिखलकर हा रणजीचा क्रिकेटपटू आहे. क्रीडा स्पर्धांमुळे अनेक खेळाडू पोलीस व विविध क्षेत्रात नोकरीला आहेत.