राजापेठ पोलिसांना सीपींकडून रिवार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 21:57 IST2019-03-17T21:56:39+5:302019-03-17T21:57:32+5:30
लग्न समारंभात चोरी करणारी अल्पवयीनांच्या टोळीचा पदार्फाश करणाऱ्या राजापेठ पोलिसांना पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी रिवार्ड घोषित केला. डीबी पथकाने चोरांकडून लाखोंचा मुद्देमाल जप्ती करून यशस्वी डिटेक्शन केल्याची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आहे.

राजापेठ पोलिसांना सीपींकडून रिवार्ड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लग्न समारंभात चोरी करणारी अल्पवयीनांच्या टोळीचा पदार्फाश करणाऱ्या राजापेठ पोलिसांना पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी रिवार्ड घोषित केला. डीबी पथकाने चोरांकडून लाखोंचा मुद्देमाल जप्ती करून यशस्वी डिटेक्शन केल्याची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आहे.
शुक्रवारी सायंकाळी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी अचानक राजापेठ पोलीस ठाण्याला भेट देऊन गुन्हेविषयक घडामोडींचा आढावा घेतला. त्यानुसार पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी व त्याच्या अधिनस्त यंत्रणेला योग्य ते निर्देश दिले.
राजापेठ पोलिसांनी काही दिवसांपूर्वी लग्न समारंभातील चोरांना पकडून गुन्हा उघडकीस आणला, चंद्रपूर जाणारी लाखोंची दारू पकडली व हत्या प्रकरणातील आरोपीला गुजरातहून अटक केली. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी पोलीस निरीक्षक किशोर सुर्यवंशी, रंगराव जाधव, फिरोज खान, छोटेलाल यादव, दिनेश भिसे, राजेश गुरले, किशोर अंबुलकर यांचे कौतुक केले व प्रत्येकाला १ हजार २०० रुपयांचा रिवार्ड दिला. पोलीस आयुक्तांनी रिवॉर्ड दिल्याने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले आहे.