राजना रस्त्याची झाली घसरगुंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:10 IST2021-07-19T04:10:15+5:302021-07-19T04:10:15+5:30

फोटो पी १८ चांदूर अनेकांच्या गाड्या घसरल्या, पुलाखाली पाणी चांदूर रेल्वे : शहरापासून जवळच असलेल्या राजना या गावात जाणाऱ्या ...

Rajna road was slippery | राजना रस्त्याची झाली घसरगुंडी

राजना रस्त्याची झाली घसरगुंडी

फोटो पी १८ चांदूर

अनेकांच्या गाड्या घसरल्या, पुलाखाली पाणी

चांदूर रेल्वे : शहरापासून जवळच असलेल्या राजना या गावात जाणाऱ्या रस्त्यावर झालेल्या पावसामुळे प्रचंड चिखल जमा झाला आहे. या रस्त्यावरून राजना या गावात ये-जा करणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत असून रस्त्याची पूर्णतः घसरगुंडी झाल्याचे पहायला मिळत आहे.

रेल्वे स्टेशन परिसरातून राजना गावात जाणारा रस्ता आहे. परंतु, पाऊस झाला की, हा रस्ता पूर्णतः चिखलात दबून जात असून अंदाज येत नसल्याने अनेक दुचाकीस्वार येथे घसरून पडत आहेत. याच मार्गावर असलेल्या सिलिंडरच्या गोदामाजवळ या रस्त्याची फारच दयनीय अवस्था झाली आहे. शहरात शेतीच्या कामासाठी तसेच दवाखान्यानिमित्त शहरात येत असतात. परंतु, दुसऱ्या मार्गाने रेल्वे पुलाखाली पाणी साचल्याने थोडाही पाणी आला की, गावाचा संपर्क तुटतो. काल झालेल्या पावसाने रस्त्याच्या आजूबाजूची पूर्ण माती रस्त्यावर आली. त्यामुळे रस्त्यावर चिखल बनून रस्त्याची घसरगुंडी बनल्याचे पाहायला मिळते. अनेक दुचाकीस्वार या रस्त्यावरून घसरून पडल्याचेही दिसून आले. बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

180721\1618-img-20210718-wa0021.jpg

photo

Web Title: Rajna road was slippery