राजमाता अहल्यादेवी फाऊंडेशन करणार महिलांचा सन्मान
By Admin | Updated: June 3, 2015 00:24 IST2015-06-03T00:24:38+5:302015-06-03T00:24:38+5:30
राजमाता अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त व त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा देण्यासाठी यावर्षी पहिल्यांदाच ...

राजमाता अहल्यादेवी फाऊंडेशन करणार महिलांचा सन्मान
अमरावती : राजमाता अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त व त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा देण्यासाठी यावर्षी पहिल्यांदाच राजमाता फाऊंडेशनच्यावतीने विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या पाच महिलांना राज्यस्तरीय राजमाता अहल्यादेवी होळकर महिला गौरव पुरस्कार दिला जाईल, अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोप महात्मे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.
अहल्यादेवी यांनी केलेल्या कार्याने सर्वत्र जे नावलौकिक मिळविले ते पाहता शासनाने त्यांच्या नावाने पुरस्कार सुरू केला. धनगर समाजाच्या या महिलेने जे कर्तृत्व केले ते सर्व समाजाने वाखाणण्याजोगे आहे. या उद्देशाने राजमाता अहल्यादेवी फाउंडेशनतर्फे पाच विविध क्षेत्रातील महिलांची निवड समितीने निवड केली आहे. यामध्ये 'माहेरची साडी' या मराठी चित्रपटात सामाजिक संदेश देणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल, क्रिडा क्षेत्रात हव्याप्र मंडळाच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या माधुरी चेंडके, वैद्यकीय व समाज कार्यात योगदान देणाऱ्या स्मिता कोल्हे, उद्योग क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या उज्ज्वला हावरे, आणि प्रशासकीय सेवेत नावलौकिक प्राप्त करणाऱ्या संगीता धायगुडे या पाच महिलांना राज्यस्तरीय अहिल्यादेवी होळकर महिला गौरव पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. पत्रपरिषदेला फाऊंडेशनचे उपाध्यक्ष गणेश काळे, सचिव माधुरी ढवळे, अशोक गंधे, जानराव कोकरे, कीर्ती खन्ना उपस्थित होते. (प्रतिनिधी)