राजकुमार पटेल करणार निर्णयाविरुद्ध अपील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:17 IST2021-09-09T04:17:55+5:302021-09-09T04:17:55+5:30
परतवाडा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत अर्ज खारीज झाल्याने या निर्णयाविरुद्ध उमेदवार तथा मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल जिल्हा ...

राजकुमार पटेल करणार निर्णयाविरुद्ध अपील
परतवाडा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत अर्ज खारीज झाल्याने या निर्णयाविरुद्ध उमेदवार तथा मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल जिल्हा उपनिबंधकांकडे वकिलामार्फत गुरुवारी अपील दाखल करणार आहेत.
मंगळवारी अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान माजी महापौर प्रवीण काशीकर यांनी आमदार राजकुमार पटेल यांच्या अर्जावर हरकत नोंदविली होती. त्यानंतर बुधवारी अर्ज रद्द करण्यात आला. राजकुमार पटेल यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत अनुसूचित जमाती राखीव प्रवर्गातून संचालकपदासाठी नामांकन दाखल केले होते. धारणी तालुक्यातील साद्रावाडी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे ते संचालक आहेत. सोसायटीवर कर्ज असल्याची हरकत नोंदविण्यात आली होती. याच कारणावरून आमदार पटेल यांचे नामांकन बुधवारी अवैध ठरविण्यात आले आहे.
बॉक्स
निर्णयाविरुद्ध अपिल करणार
बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेला निकाल अमान्य असल्याने आमदार राजकुमार पटेल हे ॲड. किशोर शेळके यांच्यामार्फत गुरुवारी उमेदवारी कायम करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांकडे १५२ ए अपील अर्ज सादर करणार आहेत.
कोट
जिल्हा बँक निवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध आमदार राजकुमार पटेल यांची उमेदवारी कायम करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांकडे १५२ ए अन्वये गुरुवारी अपील दाखल करणार आहे.
ॲड. किशोर शेळके, अमरावती