नांदगावात काँग्रेसच्यावतीने राजीव गांधी यांचा स्मृतिदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:13 IST2021-05-22T04:13:15+5:302021-05-22T04:13:15+5:30

नांदगाव खंडेश्वर : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा स्मृतिदिन नांदगाव खंडेश्वर तालुका काँग्रेस, शहर काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे ...

Rajiv Gandhi Memorial Day on behalf of Congress in Nandgaon | नांदगावात काँग्रेसच्यावतीने राजीव गांधी यांचा स्मृतिदिन

नांदगावात काँग्रेसच्यावतीने राजीव गांधी यांचा स्मृतिदिन

नांदगाव खंडेश्वर : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा स्मृतिदिन नांदगाव खंडेश्वर तालुका काँग्रेस, शहर काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव परीक्षित जगताप यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम घेण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला कोरोना रुग्णाच्या लसीकरणासाठी तीस हजार रुपयांचा धनादेश तहसीलदार किशोर यादव यांच्या सुपूर्द करण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णाला नाष्टा व फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव परीक्षित जगताप, माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अमोल धवसे, सचिन रिठे, माजी सभापती फिरोज खान, गजानन मारोटकर, देविदासजी सुने, रणजित मेश्राम, सुनील शिरभाते, अमोल चवाळे, भीमराव रंगारी, अजय लाड, अजय चांदणे, विशाल इंगोले, आकाश इंगोले, अक्षय गुल्हाने,उमेश सोनोणे, आशिष जंगले आशिष चवाळे व काँग्रेसची मंडळी उपस्थित होती.

Web Title: Rajiv Gandhi Memorial Day on behalf of Congress in Nandgaon