राजीव गांधी यांनीच देशात संगणकीय क्रांती केली
By Admin | Updated: May 24, 2016 00:44 IST2016-05-24T00:44:59+5:302016-05-24T00:44:59+5:30
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीच खऱ्या अर्थाने जिल्ह्यात संगणकक्रांती केली, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण)चे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले.

राजीव गांधी यांनीच देशात संगणकीय क्रांती केली
बबलू देशमुख : राजीव गांधी पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम
अमरावती : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीच खऱ्या अर्थाने जिल्ह्यात संगणकक्रांती केली, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण)चे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोेजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे महासचिव संजय मापले यांनीदेखील त्यांचे विचार व्यक्त केले. प्रास्ताविक भय्यासाहेब मेटकर यांनी केले. देशात नवतंत्रज्ञान आणण्याचे कार्य खऱ्या अर्थाने त्यांच्याच कारकिर्दीत झाले. त्यांनी नवतंत्रज्ञाच्या सहाय्याने देशाची झपाट्याने प्रगती होणार, हे हेरले होते, असे त्यांचे महान कार्य देशाला लाभले.
यावेळी माजी राज्यमत्री यशवंतराव शेरेकर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्य विद्या देडू, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीश उईके, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष श्रीराम नेहर, महिलाध्यक्ष छाया दंडाळे, प्रल्हाद ठाकरे, जयंत देशमुख, संजय लायदे, मनोज देशमुख, लोकसभा युवका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बबलू बोबडे, भागवतराव खांडे, सतीश धोंडे, दिलीप तायडे, अक्षय कडू, विठ्ठल सरडे, अनिकेत लायदे, राजेंद्र चौधरी आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)