शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

'राजगोंड'ला सर्वोच्च न्यायालयानेही धुडकावले, जातवैधता मिळण्यासाठी समितीकडे सादर केली खोटी वंशावळ

By गणेश वासनिक | Updated: October 22, 2023 16:34 IST

सर्वोच्च न्यायालयाने हा खटला फेटाळला.

अमरावती : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 'राजगोंड' बोगस ठरविल्याच्या निर्णयाविरुद्ध नेताजी माणिकराव चौधरी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत एसएलपी १८७४३/२०२३ दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन तर्क विचारात घेत याचिकेवर विचार करण्याचे कारण दिसत नाही, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने हा खटला फेटाळला.

किनवट येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने नेताजी माणिकराव चौधरी व त्यांचा मुलगा पियूष, मुलगी प्राची यांचा अनुसूचित जमातीतील 'राजगोंड' जमातीचा दावा नाकारला होता. समितीच्या या आदेशाविरोधात नेताजी चौधरी यांनी रिट याचिका क्र.८८९४/२०२३ व प्राची चौधरी आणि पियुश चौधरी यांनी रिट याचिका क्र. ८९३२/२०२३ उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केल्यात. या याचिकांवर सुनावणी होऊन हे प्रकरण संविधानाची फसवणूक करणारे आहे. असे म्हणत उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद यांनी या तिघांच्याही याचिका फेटाळून लावल्या, हे विशेष. या खटल्याचा निर्णय न्यायमूर्ती ऋषिकेश राॅय व संजय करोल यांनी दिला आहे. याचिकाकर्त्याच्या बाजूने जेष्ठ विधिज्ञ अनिथा शेणाॅय यांनी युक्तिवाद केला.काय आहे प्रकरण ?नेताजी चौधरी यांनी स्वत: व त्यांच्या रक्तनात्यातील संबंधितांनी शालेय अभिलेखामध्ये 'राजगोंड' या अनुसूचित जमातीचा लाभ घेण्याच्या हेतूने नियमबाह्यरित्या खाडाखोड करुन जातीच्या रकान्यातील 'तेलंग' हा शब्द खोडून त्या ठिकाणी 'राजगोंड' शब्द लिहून बदल केला आहे. जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्याच्या हेतूने खोटी वंशावळ सुद्धा सादर केली होती.१४ डिसेंबर २०२२ च्या शासन निर्णयान्वये लाभ कसा?सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ च्या निर्णयात अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर नियुक्त झालेल्या परंतु नंतर ज्यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरले, अशांच्या नियुक्त्या बेकायदेशीर ठरविल्या आहे. राज्य शासनाने घटनेतील तरतुदींशी विसंगत पाच शासन निर्णय २१ डिसेंबर २०१९ रोजी रद्द केले. नियुक्त्याच कायदेशीर नाही तर १४ डिसेंबर २०२२ च्या शासन निर्णयान्वये लाभ कसा? त्यामुळे शासनाने आदिवासी समाजाच्या १२ हजार ५०० जागांची विशेष पदभरती मोहीम चालू करावी, अशी मागणी ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रमोद घोडाम यांनी शासनाकडे पत्राद्वारे केली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे अखिल भारतीय गोंड आदिवासी संघाच्यावतीने स्वागत आहे. राज्याच्या ज्या भागात गोंड, राजगोंड जमातीत घुसखोरी झाली, त्याचा शोध शासनाने घ्यावा. संपूर्ण चौकशी करुन दोषींवर कठेार कारवाई करावी.- डॉ. संदीप धुर्वे आमदार, तथा राज्याध्यक्ष अ.भा.गोंड आदिवासी संघ, महाराष्ट्र.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय