राजापेठ उड्डाण पुलाचा तिढा सुटेना

By Admin | Updated: November 1, 2014 22:44 IST2014-11-01T22:44:51+5:302014-11-01T22:44:51+5:30

मागील १५ वर्षांपासूनची मागणी असलेल्या येथील राजापेठ रेल्वे क्रॉसींगवरील उड्डाल पूल निर्मितीचे दोन ते तीन वेळा भूमिपूजन झाल्यानंतरही प्रत्येक्षात बांधकामाला सुरुवात झाली नाही.

Rajdhith's flyover's three-wheeler | राजापेठ उड्डाण पुलाचा तिढा सुटेना

राजापेठ उड्डाण पुलाचा तिढा सुटेना

अमरावती: मागील १५ वर्षांपासूनची मागणी असलेल्या येथील राजापेठ रेल्वे क्रॉसींगवरील उड्डाल पूल निर्मितीचे दोन ते तीन वेळा भूमिपूजन झाल्यानंतरही प्रत्येक्षात बांधकामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे या उड्डाण पुलाच्या निर्मितीबाबतची वास्तविकतेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. जनतेपुढे लोकप्रतिनिधी, प्रशासनाने वास्तविकता स्पष्ट करावी, यासाठी सोमवारी ३ नोव्हेंबर रोजी राजापेठ रेल्वे क्रॉसिंग गेट कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती मुन्ना राठोड यांनी दिली.
राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाण पुलाचा मुद्दा हा राजकारणांच्या हातचे बाहुले झाले असून कोणाच्याही मनात येईल, तेव्हा भूमिपूजन असा नागरिकांच्या भावनेशी खेळण्याचा नवा प्रकार सुरु झाल्याचा आरोप मुन्ना राठोड, नितीन मोहोड यांनी केला आहे. या उड्डाण पुलाचे डिझाईन, ड्रॉर्इंग, इस्टिमेट बदलले असताना याची माहिती या भागातील रहिवाशांना का? दिली जात नाही, असा सवाल उपस्थित क रण्यात आला आहे. राज्य शासन, रेल्वे आणि महापालिका असे संयुक्तपणे निधीतून या उड्डाण पुलाचे काम हाती घेतले जाणार आहे. मात्र रस्ते चौपदीकरणात या उड्डाणपुलाचे इस्टिमेट बदलले आहे. या पुलाच्या निर्मितीसाठी वाढीव रक्कम कोठून, कशी आणणार याची माहिती नागरिकांना जाहीरपणे मिळावी, यासाठी हे धरणे आंदोलन केले जात आहे.

Web Title: Rajdhith's flyover's three-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.