शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात; खासदार अरविंद सावंत यांची बोचरी टीका 

By गणेश वासनिक | Updated: August 10, 2024 20:36 IST

कर्तृत्ववान महिलांना स्त्रीशक्ती सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आले असता अरविंद सावंत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

गणेश वासनिक / अमरावती अमरावती : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात. शरद पवार कसे चांगले, नरेंद्र मोदी कसे चांगले, असे आपल्या राजकीय लाभासाठी सोयीनुसार निर्णय घेतात, अशी बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शनिवारी येथे केली. अमरावती येथे शिवसेना जिल्ह्याच्या वतीने आयाेजित कर्तृत्ववान महिलांना स्त्रीशक्ती सन्मान पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आले असता, ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

खासदार सावंत यांच्या मते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोबत घेणे फार चुकीचे झाले, हा विषय बाहेर येतो, नव्हे तो जाणीवपूर्वक चौकटीतून बाहेर आणला जातो. अजित पवारांना पण कळू द्या, त्यांची महायुतीत काय किंमत आहे. आता मात्र, देवेंद्र फडणवीस यांना पश्चात्ताप होत आहे, पण यात राज्याच्या जनतेची फसवणूक हाेत आहे. महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसांचा हात होता. भाजपने अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथे आरोप केले. नंतर या आरोपाचे समर्थन करून पवारांना नंतर क्लीन चिट दिली. एवढेच नव्हे, तर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री केले. अजित पवारांविरुद्ध आरोपाचे ट्रकभर पुरावे असल्याचे सांगणारे देवेंद्र फडणवीस हेच सोबत मांडीला मांडी लावून बसत आहे. स्वार्थासाठी भाजप कोणत्या स्तरावर गेली, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. खरे तर महायुतीत असणारे सत्ता जिहादी आहेत. यामध्ये महाराष्ट्र लाचारी झाला, असा आरोप अरविंद सावंत यांनी महायुतीवर केला.

यावेळी अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमोद कोहळे, प्रकाश मारोटकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेArvind Sawantअरविंद सावंत