पावसाचा जोर ओसरला
By Admin | Updated: July 15, 2016 00:33 IST2016-07-15T00:33:19+5:302016-07-15T00:33:19+5:30
यावर्षी मान्सून विदर्भमार्गे राज्यात दाखल झाला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली व हे क्षेत्र मध्यप्रदेशमार्गे

पावसाचा जोर ओसरला
आता आॅगस्टमध्ये मुसळधार : दोन आठवड्यांत वार्षिक सरासरीच्या दुप्पट पाऊस
अमरावती : यावर्षी मान्सून विदर्भमार्गे राज्यात दाखल झाला. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली व हे क्षेत्र मध्यप्रदेशमार्गे विदर्भात सरकल्यामुळे विदर्भात पावसाचे आगमन झाले. या आठवड्यात मध्यप्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने जिल्ह्यात सलग जोरदार पाऊस पडला. पावसाचा जोर आता ओसळला असला तरी जुलै अखेरपर्यंत काही ठिकाणी कधी अधिक पाऊस पडणार आहे.
पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार जिल्ह्यासह विदर्भात जुलै अखेर पाऊस कमी राहणार असला तरी आॅगस्ट महिन्यात सातत्याने पाऊस चांगलीच हजेरी लावणार आहे. दरम्यान २४ तासात पाऊस जिल्ह्यात निरंक राहिला.
जिल्ह्यात यंदा अपेक्षित वार्षिक सरासरीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा अधिक पाऊस गेल्या १५ दिवसांत पडला आहे. यंदा पावसाची ८१४.५ मिमी वार्षिक सरासरी अपेक्षित असताना १३ जुलैपर्यंत ४६०.८ मिमी पावसाची नोंद झाली ही १७५.९ टक्केवारी आहे. तर हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ५६.६ टक्के आहे.
जिल्ह्यात १ जून ते १३ जुलै या कालावधीत २६९.९ मिमी पावसाची अपेक्षित सरासरी असताना आतापर्यंत ४६०.८ मिमी पाऊस पडला. सर्वाधिक ६२९ मिमी पाऊस चिखलदरा तालुक्यात पडला तर सर्वात कमी ३३२.२ मिमी पाऊस भातकुली तालुक्यात पडला. अमरावती तालुक्यात ३५९.३ मिमी, नांदगाव खंडेश्वर ३९२.३ मिमी, चांदूररेल्वे ४०९.मिमी, अचलपूर ४६०.३ मिमी, चांदूरबाजार ४४१.२ मिमी, दर्यापूर ४७७.४ मिमी, अंजनगाव सुर्जी ४३७.८ मिमी, मोर्शी ५६२.६ मिमी व धारणी तालुक्यात ५९१.४ मिमी पाऊस पडला. ४८ तासांत जिल्ह्यात ९०.७ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये धारणी तालुक्यात ६६ मिमी पाऊस आहे. ही अतिवृष्टी समजण्यात येते. अमरावती तालुक्यात १७.२, भातकुली १४.२, नांदगाव खंडेश्वर ९, चांदूररेल्वे १६.८, धामणगाव रेल्वे २२, तिवसा ३, मोर्शी १९.२, वरुड २८.६, अचलपूर १४.१, चांदूरबाजार ९, दर्यापूर ३९, अंजनगाव १६, अशी नोंद झाली आहे.
पावसाची आतापर्यंत १७५.९ टक्केवारी
जिल्ह्यात १४ जुलैपर्यंत १७५.९ टक्के पाऊस पडला. सर्वाधिक २२९ टक्के पाऊस अंजनगाव सुर्जी तालुक्यात पडली तर सर्वात कमी १३८.४ मिमी पाऊस भातकुली तालुक्यात पडला. अमरावती १५१.९, नांदगाव १५६.४, चांदूररेल्वे १६४.९, धामणगाव १८५.३, तिवसा २२२.७, मोर्शी २१७.०, वरुड ११७.८, अचलपूर १९३.३, चांदूरबाजार १९०.५, दर्यापूर २१५.८, धारणी १८३.४ व चिखलदरा तालुक्यात १४८ टक्के पाऊस पडला.
वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५६.६ टक्के पाऊस
जिल्ह्यात पावसाची वार्षिक ८१४.५ सरासरी अपेक्षित आहे. त्या तुलनेत आतापर्यंत ५६.६ टक्के पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक ७५.५ टक्के पाऊस तिवसा तालुक्यात पडला. अमरावती ४६.९, भातकुली ४५, नांदगाव ५३.१, चांदूररेल्वे ५४.४, धामणगाव ६२.८, मोर्शी ७४.२, वरुड ४०.७, अचलपूर ६६, चांदूरबाजार ६४.१, दर्यापूर ७४.९, अंजनगाव ७१, धारणी ५०.४ व चिखलदरा तालुक्यात ४१.२ टक्के पाऊस पडला.