पावसाचा शहरातही जाणवला परिणाम

By Admin | Updated: March 2, 2015 00:28 IST2015-03-02T00:28:16+5:302015-03-02T00:28:16+5:30

शनिवार, रविवार असा दोन दिवस पाऊस बरसल्याने शहरातही परिणाम जाणवले. येथील मालवीय चौकात पावसाचे पाणी वाहून जाण्यास व्यत्यय निर्माण झाल्याने पाणी तुंबून राहिले.

Rainfall felt in the city | पावसाचा शहरातही जाणवला परिणाम

पावसाचा शहरातही जाणवला परिणाम


अमरावती : शनिवार, रविवार असा दोन दिवस पाऊस बरसल्याने शहरातही परिणाम जाणवले. येथील मालवीय चौकात पावसाचे पाणी वाहून जाण्यास व्यत्यय निर्माण झाल्याने पाणी तुंबून राहिले. त्यामुळे वाहनचालकांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागला. कोठेही नुकसान झाल्याची नोंद महापालिकेत नाही. परंतु सततच्या पावसाने नालाकाठच्या वस्त्यांना फटका बसला. काही नाल्यांमधील पाणी वाहून जाताना ते रस्त्यावरच साचून राहिले. नोकरदार वर्गांना रविवार हा दिवस ‘प्लॅनिंग’चा दिवस राहतो. परंतु शनिवारी दुपारपासूनच पावसाने सुरुवात केली होती. हा पाऊस रविवारी दुपारपर्यंत सुरुच राहिला. त्यामुळे सुट्टीच्या रविवारची मौजमजा न करता नोकरदारांना घरीच बसावे लागले. शहरात नुकसान झाल्याची नोंद नसली तरी आपत्कालीन कक्ष सजग होता.

Web Title: Rainfall felt in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.