शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगाव, दर्यापूरला अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 06:00 IST

गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास परतीच्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दर्यापूर, अंजनगाव व धारणी या तीन तालुक्यांत शुक्रवार दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. पावसाने तीन प्रकल्पांची दारे उघडण्यात आली आहेत.अंजनगाव सुर्जी तालुक्यात १८ आॅक्टोबरपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शुक्रवारी सकाळी कहर केला.

ठळक मुद्देवडनेरगंगाई, भंडारज गावात पाणी शिरले : क पाशी, सोयाबीन नेस्तनाबूत; नदीनाल्यांना पूर, धरणाची दारे उघडली

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी/धारणी/दर्यापूर : तिन्ही तालुक्यांना गुरुवारी रात्री परतीच्या पावसाने चांगलाच तडाखा दिला. अंजनगाव सुर्जीतील भंडारज गावात पुराचे पाणी शिरले, तर दर्यापूर तालुक्यातील येवदालगतच्या वडनेरगंगाई गावातून वाहणाऱ्या बोर्डी नदीला मुसळधार पावसाने पृूर आला. अंजनगाव व सुर्जी या दोन गावांच्या मध्यभागातून वाहणाºया शहानूर नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने चक्क हिवाळ्यात शुक्रवारी दुपारी हा मार्ग बंद होता.गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास परतीच्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दर्यापूर, अंजनगाव व धारणी या तीन तालुक्यांत शुक्रवार दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. पावसाने तीन प्रकल्पांची दारे उघडण्यात आली आहेत.अंजनगाव सुर्जी तालुक्यात १८ आॅक्टोबरपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शुक्रवारी सकाळी कहर केला. सतत तीन तास आलेल्या पावसाने तालुक्यातील पाचही मंडळांत प्रचंड पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस भंडारज मंडळात कोसळला. भंडारज, कारला, तुरखेड, जवर्डी, धनवाडीसह पूर्ण मंडळातील कपाशीची हानी झाली.शुक्रवारी मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानासंदर्भात पंचनामे करण्याच्या तसेच जनावरांची जीवितहानी झाली असेल, तर आर्थिक मदत देण्याच्या सूचना अंजनगावच्या तहसीलदारांना दिल्या आहेत.- बळवंत वानखडेआमदार, दर्यापूरशहानूरची दारे उघडलीशहानूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणाचे चारही दरवाजे १० सेंटिमीटरने उघडण्यात आले. शहानूर नदी दुथडी भरून वाहत आहे. अकोट ते अंजनगाव रस्त्यावर सातेगावजवळील निर्माणाधीन पुलाच्या बाजूचा रपटा वाहून गेल्याने सकाळपासूनच हा रस्ता रहदारीसाठी बंद होता.अकोट-अंजनगाव वाहतूक ठप्प; तीन गाई वाहून गेल्यावनोजा बाग : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कारला, सातेगाव, गावंडगाव, निमखेड बाजार, हिरापूर, भंडारज, चिंचोली, वनोजा, हंतोडा, विहिगाव परिसरात शुक्रवारी सकाळी ६ वाजता अचानक झालेल्या अतिवृष्टीने नदी-नाल्यांना पूर आला. पुरात नाल्याकाठच्या घरांतील जीवनावश्यक वस्तू, भांडीकुंडी वाहून गेली. कारला येथील मुरलीधर डोंगरकर यांच्या तीन गाई वाहून गेल्या. कौसल्याबाई रतन इंगळे यांचे पाच पोते सोयाबीन वाहून गेले. सातेगाव फाट्याजवळ पुरामुळे पर्यायी रस्ता वाहून गेल्याने अकोट-अंजनगाव मार्ग दिवसभर बंद होता.मेळघाटात परतीच्या पावसाने ‘ओला दुष्काळ’धारणी : तालुक्यात गुरुवारी रात्री व शुक्रवारी दुपारी १२ पर्यंत कोसळलेल्या मुसळधार पावसाने धान पीक पूर्णत: झोपले. येथे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आता बुलंद होऊ लागली आहे. महसूल प्रशासनाकडून संयुक्त सर्र्वेेक्षणाचे आदेश देण्यात आले असले तरी तालुक्यातील १५० गावांचे सर्वेक्षण १२ तलाठी, २८ कृषिसेवकांच्या भरवशावर ८ नोव्हेंबरपर्यंत अवघड आहे. यामुळे विनाअट भरपाई देण्याची मागणी शेतकरी बांधवानी केली आहे. 

टॅग्स :Rainपाऊस