पेरणीनंतर पावसाची दडी

By Admin | Updated: June 29, 2015 00:40 IST2015-06-29T00:40:00+5:302015-06-29T00:40:00+5:30

जिल्ह्यात १२ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले. नंतर पाच दिवसांनी मान्सूनचा नियमित पाऊस पडला.

Rainfall after the sowing | पेरणीनंतर पावसाची दडी

पेरणीनंतर पावसाची दडी

शेतकरी चिंतेत : आठवडा कोरडा गेला, ७५ टक्के पेरणी बाकी
अमरावती : जिल्ह्यात १२ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले. नंतर पाच दिवसांनी मान्सूनचा नियमित पाऊस पडला. त्यामुळे खरिपाच्या पेरणीला वेग आला. परंतु २२ जूननंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात २५ टक्के क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. दोन दिवसांत पाऊ स न आल्यास निम्म्या पेरणीक्षेत्रात मोड येण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीला १५ जूनपासून सुरुवात झाली. नंतर आठवडाभर सतत सार्वत्रिक पाऊस झाला. खरिपाच्या पेरणीला आवश्यक ६५ ते ७० मि.मी. पाऊस झाला असल्याने खरिपाच्या पेरणीला वेग आला. जिल्ह्यात ७ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्रापैकी दीड लाख हेक्टर क्षेत्रात सद्यस्थितीत पेरणी आटोपली आहे. यापैकी १ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रात कपाशी व सोयाबीनची पेरणी झालेली आहे. मात्र २२ जूनपासून अद्यापपर्यंत पावसाने दांडी मारली आहे. संरक्षित सिंचनाची सुविधा असणाऱ्या क्षेत्रात स्प्रिंक्लर सुरु झाले आहेत. मात्र कोरडवाहू क्षेत्रात बिजांकुर करपण्याच्या स्थितीत आहे.
पेरणी झालेल्या शेतात बियाणे अंकुरण होण्यास ओलाव्याची कमी भासत आहे. अशीच स्थिती दोन दिवस राहिल्यास कोरडवाहू क्षेत्रात झालेल्या पेरणीत किमान २ टक्के शेतात मोड येण्याची भीती निर्माण झाली आहे. तीन वर्षांपासून नापिकीचे सत्र सुरू आहे. मागील वर्षी दीड महिना उशिरा पाऊस आल्यामुळे पीक उद्ध्वस्त झाले. यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षीच्या तुलनेत चारपट म्हणजे १९५ मि.मी. पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु २२ तारखेपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

चार दिवसांपासून
पाऊ स निरंक
२४ जून रोजी चिखलदरा, मोर्शी व वरुड तालुक्यात ५ ते ७ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यानंतर २८ तारखेपर्यंत जिल्ह्यात कुठेही पाऊ स पडला नाही. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

तीन दिवसांत तुरळक, नंतर आठवडा कोरडा
जिल्ह्यात आठ दिवसांत काही तालुक्यात तुरळक पाऊ स पडला. २८ ते ३० जूनदरम्यान काही ठिकाणी आणखी तुरळक पाऊ स पडण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर पुुढील आठ दिवस (५ जुलैपर्यंत) पुन्हा कोरडा राहण्याची शक्यता श्री शिवाजी कृ षी महाविद्यालयाचे हवामन तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.

Web Title: Rainfall after the sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.