पारधी बेड्यात शिरले पावसाचे पाणी
By Admin | Updated: July 1, 2016 00:14 IST2016-07-01T00:14:47+5:302016-07-01T00:14:47+5:30
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील पारधी बेड्यातील ५० झोपड्यांत पावसाचे पाणी शिरल्याने अतोनात हानी झाली.

पारधी बेड्यात शिरले पावसाचे पाणी
५० घरे पाण्याखाली : प्राणहानी टळली, नांदगाव तालुक्यातील घटना
नांदगाव खंडेश्वर /मंगरूळ चव्हाळा : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील पारधी बेड्यातील ५० झोपड्यांत पावसाचे पाणी शिरल्याने अतोनात हानी झाली. या घरांमध्ये तीन ते चार फूट पाणी साचले होते. गुरूवारी तालुक्यात संततधार पाऊस पडला.
गुरूवारी दुपारपासून पाऊस सुरू आहे. मंगरूळमधील नाल्याची धार फोडून पावसाचे पाणी अकस्मात शेतातून वाहत जाऊन येथील पारधी बेड्यात शिरले. या बेड्यात पारधी समाजातील नागरिकांची ५० घरे आहेत. घरांमध्ये तीन ते चार फूट पाणी साचल्याने घरातील किडूकमिडूक आणि धनधान्य वाहून गेले. वस्तुंचीदेखील प्रचंड हानी झाली. पश्चात पाऊस थांबल्याने पुढील हानी टळली. पावसाची धार अखंडित राहिली असती तर मोठी हानी झाली असती. यातही पारधी कुटुंब उघड्यावर आले आहेत. (वार्ताहर)