‘पाऊस गाण्यां’वर थिरकली पावले!

By Admin | Updated: July 24, 2015 00:10 IST2015-07-24T00:10:43+5:302015-07-24T00:10:43+5:30

‘कलर्स’प्रस्तुत ‘झलक दिखला जा’तर्फे मंगळवारी स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित ‘रिमझिम गाणी झलक सुहानी’ या कार्यक्रमात ‘लोकमत’ सखीमंच सदस्यांनी धम्माल केली.

'Rain singing' has swirled! | ‘पाऊस गाण्यां’वर थिरकली पावले!

‘पाऊस गाण्यां’वर थिरकली पावले!

अमरावती : ‘कलर्स’प्रस्तुत ‘झलक दिखला जा’तर्फे मंगळवारी स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित ‘रिमझिम गाणी झलक सुहानी’ या कार्यक्रमात ‘लोकमत’ सखीमंच सदस्यांनी धम्माल केली.
भारतातील सर्वात मोठा सेलिब्रिटी डान्स शो ‘झलक दिखला जा’ दर शनिवारी व रविवारी रात्री ९ वाजता कलर्स चॅनलवर सुरू झाला आहे. या सिझनमध्ये नव्या पिढीचे आवडते कलावंत शाहिद कपूर व कल्पक दिग्दर्शक करण जोहर हे परीक्षक म्हणून डान्स गुरू गणेश हेगडे व लॉरेन गॉटलीसोबत काम बघत आहेत. ज्यामध्ये १२ सेलिब्रिटी आपल्या नृत्याचे कौशल्य दाखवीत आहेत. या कार्यक्रमावर आधारित प्रश्नमंजूषादेखील घेण्यात आली. विजेत्यांना कलर्सतर्फे बक्षिसे देण्यात आलीत. कलर्स प्रस्तुत सखीमंचच्या ‘रिमझिम गाणी झलक सुहानी’ या कार्यक्रमात गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर सुनील वाघमारे, मो. रफींची गाणी सलग १५० तास गाण्याचा विक्रम करणाऱ्या प्राजक्ता मानकर व दीपक मांगलेकर या प्रसिध्द गायकांनी पावसाशी संबंधित तसेच इतरही अनेक सुरेल गाणी सखींसमोर सादर केली.
त्यांनी गायिलेल्या गाण्यांमध्ये ‘आज मौसम बडा..., ओ सजना बरखा बहार आयी..., रिमझिम गिरे सावन..., दिवाना हुआ बादल...,ही गुलाबी हवा..., प्रितीचं झुळझुळ पाणी..., गुुलाबी आँखे जो तेरी देखी..., या सदाबहार गाण्यांचा समावेश होता. कोरिओग्राफर नितीन आसुदानी यांच्या स्टार डान्स अकादमीच्या विद्यार्थ्यांनी आणि सखीमंच सदस्यांनी आकर्षक नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. कार्यक्रमात महापौर चरणजितकौर नंदा, ‘लोकमत’चे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे, संपादकीय प्रमुख गणेश देशमुख, स्टार डान्स अकादमीचे नितीन आसुदानी, नगरसेविका अर्चना इंगोले, जयश्री मोरे उपस्थित होत्या.
सखींनी धरला फेर
पाऊसगाण्यांवर सखीमंच सदस्य महिलांनी उत्साहाने फेर धरला. त्यामुळे अख्खे सभागृह दणाणून गेले होते. अनेक सखींनी लयबध्द नृत्य सादर करून त्यांच्यातील सुप्त कलागुणांचे प्रदर्शन केले. महिलांनी या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला.
प्रश्नमंजूषा स्पर्धेतील विजेते
कार्यक्रमात आयोजित प्रश्नमंजूषा स्पर्धेत नीलिमा पाटील, रंजना वाघ, राधिका देशमुख, रश्मी अग्रवाल, साक्षी गुल्हाने, माया पांचाळे, कविता बलोंद, निखात खान, मनीषा डाखोरे, रंजना देशमुख या विजयी ठरल्या. त्यांना पुरस्कृत करण्यात आले.

Web Title: 'Rain singing' has swirled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.