शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात आपत्तीचे ३० बळी, २७ जखमी, ८०७ गावे बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 17:50 IST

यंदाच्या पावसाळ्यात सद्यस्थितीत नैसर्गिक आपत्तीमुळे विभागातील ३० नागरिकांचा बळी गेला, तर या आपत्तीमध्ये २७ नागरिक जखमी झालेत.

 अमरावती - यंदाच्या पावसाळ्यात सद्यस्थितीत नैसर्गिक आपत्तीमुळे विभागातील ३० नागरिकांचा बळी गेला, तर या आपत्तीमध्ये २७ नागरिक जखमी झालेत. संततधार पावसाने ८०७ गावे बाधित झालीत. यामध्ये ३,७८६ कुटुंबांतील ७,८३८ नागरिक बेघर झालेले आहेत. अतिवृष्टी व नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे ६८,८३८ हेक्टर शेतजमीन खरडल्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

 विभागात सद्यस्थितीत अकोला, वाशीम जिल्हा वगळता अमरावती, यवतमाळ, बुलडाणा जिल्ह्यात पावसाचीे सरासरी माघारली आहे. सरासरीच्या ८ टक्के पाऊस जास्त झाला. यामध्ये नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे व वीज पडल्याने ३० नागरिकांचा बळी गेला. या कालावधीत संततधार पावसामुळे ८०७ गावांत ३,७८६ कुटुंबांतील ७,८३८ व्यक्ती बाधित झाल्यात. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ८०८ कुटुंबातील १३९, अकोला जिल्ह्यात ७६२ कुटुंबांतील ३,०४८ व यवतमाळ जिल्ह्यात २,२१६  कुटुंबांतील ४,७८५ व्यक्ती बाधित झाल्यात. या कालावधीत ३० नागरिकांचा बळी गेला. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ७, अकोला १, यवतमाळ १२, बुलडाणा ४, व वाशिम जिल्ह्यात ६ व्यक्तींचा समावेश आहे. या आपत्तीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील ११, अकोला ६,अमरावती ५,बुलडाणा १ व वाशीम जिल्ह्यात ४ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. या कालावधीत नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील ६८,४३८ हेक्टरमधील शेतजमीन खरडून गेली, तर अकोला जिल्ह्यात ४,६०४, बुलडाणा १.१० हेक्टर व यवतमाळ जिल्ह्यातील २९ हेक्टर जमिनीतील शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाद्वारा बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

मृताच्या वारसांना ९६ लाखांची मदतयामध्ये २४ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली, या प्रकरणात ९६ लाखांची मदत देण्यात आली. यामध्ये ३ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. या आपत्तीमध्ये मोठी दुधाळ १०४ जनावरे मृत झाली. यापैकी १५ प्रकरणांत ४.३८ लाखांची मदत देण्यात आली. २०४ लहान दुधाळ जनावरे मृत झाली यापैकी २८ प्रकरणात १.०५लाखांची मदत देण्यात आली. ओढकाम करणारी ९ जनावरे दगावलीत.  

आपत्तीमध्ये ९,९५८ घरांची पडझडया नैसर्गिक आपत्तीमध्ये २५१ घरांची पूर्ण, १४२६ घरांची अंशत:, ९१५८ कच्च्या घरांची अंशत: पडझड झाली. ७५ झोपड्या, तर २७ गोठ्यांचे १०० टक्के नुकसान झाले. आतापर्यंत ४ लाखांची मदत शासनाद्वारा देण्यात आली. आपत्तीमध्ये पुरात वाहून गेल्यामुळे १४ व्यक्ती, अंगावर वीज पडल्याने १० व आपत्तीच्या इतर कारणांमुळे ६ व्यक्ती अशा ३० नागरिकांचा बळी गेला.

टॅग्स :RainपाऊसVidarbhaविदर्भ