लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शकुंतला नॅरोगेज रेल्वेपाठोपाठ लॉकडाऊनमध्ये बंद पडलेले अचलपूर येथील रेल्वेचे रिझर्व्हेशन काऊंटर अखेर सोमवारी उघडले गेले. धावत असलेल्या विशेष रेल्वेगाड्यांच्या आरक्षणाची आणि ज्यांना तिकीट रद्द करून पैसे परत घ्यायचे आहेत, त्यांच्याकरिता ही सोय आता या काऊंटरवर उपलब्ध झाली आहे.अचलपूर येथील रेल्वेचे रिझर्व्हेशन काऊंटर २३ मार्चपासून बंद पडले होते. त्यामुळे तिकीट रद्द करून पैसे परत घेण्याकरिता नागरिकांना अमरावतीला जावे लागत होते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू नसल्यामुळे याकरिता नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अमरावतीला जाण्याचा नाहक भुर्दंड त्यांना बसत होता. त्याबाबत ‘लोकमत’ने रविवारी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तानंतर लागलीच सोमवारी हे रिझर्व्हेशन सेंटर सुरू करण्यात आले. नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. त्यापाठोपाठ ब्रॉडगेज रेल्वे सुरू व्हावी, अशी अपेक्षासुद्धा व्यक्त केली.वेळ वाढवलीअचलपूर येथील रेल्वे रिझर्व्हेशन काऊंटरवर लॉकडाऊनपूर्वी सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आरक्षणाची आणि तिकीट रद्द करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. सोमवारी उघडल्या गेलेल्या या काऊंटरची वेळही आता वाढविण्यात आली आहे. आता हे काऊंटर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत सुरू राहणार आहे.
अचलपूर येथील रेल्वे रिझर्व्हेशन काऊंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:01 IST
अचलपूर येथील रेल्वेचे रिझर्व्हेशन काऊंटर २३ मार्चपासून बंद पडले होते. त्यामुळे तिकीट रद्द करून पैसे परत घेण्याकरिता नागरिकांना अमरावतीला जावे लागत होते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू नसल्यामुळे याकरिता नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अमरावतीला जाण्याचा नाहक भुर्दंड त्यांना बसत होता. त्याबाबत ‘लोकमत’ने रविवारी वृत्त प्रकाशित केले होते.
अचलपूर येथील रेल्वे रिझर्व्हेशन काऊंटर सुरू
ठळक मुद्देपायपीट थांबली : नागरिकांनी व्यक्त केला आनंद