रेल्वे गाड्यात प्रवाशांची उडाली तारांबळ

By Admin | Updated: November 16, 2015 00:15 IST2015-11-16T00:15:37+5:302015-11-16T00:15:37+5:30

दिवाळीत घरी आलेल्यांना परतीचा प्रवास करताना रेल्वे गाड्यात आरक्षण मिळाले नाही. परिणामी प्रवाशांना पुणे, मुंबईकडे जाताना तारांबळ उडाल्याचे चित्र अनुभवता आहे.

Railway passengers fired in the train | रेल्वे गाड्यात प्रवाशांची उडाली तारांबळ

रेल्वे गाड्यात प्रवाशांची उडाली तारांबळ

पुणे, मुंबईसाठी एकच झुंबड : नो-रुम, आरक्षण मिळाले नाही
अमरावती : दिवाळीत घरी आलेल्यांना परतीचा प्रवास करताना रेल्वे गाड्यात आरक्षण मिळाले नाही. परिणामी प्रवाशांना पुणे, मुंबईकडे जाताना तारांबळ उडाल्याचे चित्र अनुभवता आहे. रविवारी रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी होती. सुमारे ८०० ते एक हजार प्रतीक्षा यादीचे तिकीट घेऊन रेल्वेने प्रवास करावा लागला, हे विशेष.
नोकरी, व्यवसाय, खासगी कामानिमित्त पुणे, मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, हैदराबाद, सूरत आदी प्रमुख शहरात असलेल्यांनी दिवाळीत घर गाठले होते. घरी दिवाळी उत्सवाला जायचे म्हणून कसेतरी प्रवास केला. मात्र दिवाळीनंतर परतीचा प्रवास फारच बिकट झाला आहे. अमरावती, बडनेरा रेल्वेस्थानकावर पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी एकच गर्दी केली होती. १६ नोव्हेंबर रोजी कार्यालयात रुजू व्हायचे असल्याने मिळेल त्या जागी प्रवास करण्याची अनेकांनी तयारी पाहावयास मिळाली. रविवारी एकश दोन तरी विशेष रेल्वे गाड्या सुरु होतील, अशी अपेक्षा होती. परंतु रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या या आशेवर पाणी फेरल्याचे दिसून आले. गत चार ते पाच दिवसांपासून रेल्वे आरक्षण खिडक्यांवर प्रचंड रांग तरीदेखील क्षणात तात्काळचे आरक्षण बंद हेच चित्र बघावयास मिळाले.
काही जणांनी तीन ते चार महिन्यांपूर्वीच दिवाळी दरम्यान रेल्वे गाड्यांचे आरक्षण करुन ठेवले होते. मात्र ज्यांनी वेळेवर दिवाळीत घर गाठले त्यांना अनेक समस्यांचा सामना करुन प्रवास करावा लागला आहे. रेल्वे तिकीट दलालांकडेही ‘रविवारचे बोलू नका’ हेच उत्तर प्रवाशांना मिळाले. अमरावती-मुंबई एक्स्प्रेसमध्ये एक हजारपर्यंत आरक्षण तिकिटांची प्रतीक्षा यादी होती. ही यादी शेवटपर्यत कायम होती. यात कोणताही बदल झाला नसल्याचे अमरावती रेल्वे स्थानकाचे प्रबंधक गुजर यांनी सांगितले.

खासगी ट्रॅव्हल्सचा प्रवाशांच्या खिशावर डल्ला
पुणे, नाशिक, औरंगाबादकडे जाणाऱ्या प्रवाशांची उसळलेली गर्दी बघून खासगी ट्रॅव्हल्स संचालकांनी प्रवाशांच्या खिशावर अक्षरश: डल्ला मारला आहे. पुण्याचे प्रवास भाडे दोन ते अडीच हजार रुपये आकारण्यास कोणतीही कुचराई केली नाही. काही संचालकांनी पुणेसाठी विशेष ट्रॅव्हर्ल्स सुरु करुन मोठी कमाई केली आहे. मात्र या प्रकाराने प्रवाशांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला, हे वास्तव आहे.

नागपूर-पुणे विशेष रेल्वे आज सुटणार
दिवाळीत प्रवाशांची गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वे प्रशासनाने नागपूर-पुणे ही विशेष गाडी १६ नोव्हेंबर रोजी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे-नागपूर ही गाडी १३ नोव्हेंबर रोजी आली होती. हीच गाडी आता सोमवारी नागपूर येथून पुणेकरीता रात्री १० वाजून ४० मिनिटांनी सुटणार आहे. या गाडीचे आरक्षणदेखील हाऊसफुल्ल आहेत. पुणेकडे जाणाऱ्यांची मोठी संख्या असूनही रेल्वेने विशेष गाड्या सुरू न केल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Railway passengers fired in the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.