सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे ‘हाऊसफुल्ल’

By Admin | Updated: October 3, 2015 00:10 IST2015-10-03T00:10:08+5:302015-10-03T00:10:08+5:30

रेल्वे गाड्यांचे आरक्षण हे १२० दिवस अगोदर मिळते. मात्र नवदुर्गोत्सव आणि दिवाळीच्या पार्श्वभूमिवर रेल्वे गाड्यांचे आरक्षण पहिल्याच दिवशी ‘हाऊसफुल्ल’ झाले आहे.

Railway 'housefamily' on festive occasions | सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे ‘हाऊसफुल्ल’

सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे ‘हाऊसफुल्ल’

आरक्षण ‘नो- रु म’: लांबपल्ल्याच्या गाड्यांना प्रवाशांची पसंती
अमरावती : रेल्वे गाड्यांचे आरक्षण हे १२० दिवस अगोदर मिळते. मात्र नवदुर्गोत्सव आणि दिवाळीच्या पार्श्वभूमिवर रेल्वे गाड्यांचे आरक्षण पहिल्याच दिवशी ‘हाऊसफुल्ल’ झाले आहे. लांबपल्ल्यांच्या गाड्यांमध्ये हल्ली ‘नो- रुम’ असे फलक खिडक्यावर झळकू लागले आहे. त्यामुळे रेल्वेचे आरक्षण कसे मिळवावे, या विवंचनेत प्रवासी आहेत.
नवरात्रोत्सव २१ आॅक्टोंबर तर ११ नोंव्हेंबर रोजी दिवाळी हा सण आहे. या दोन्ही सण, उत्सवाचे अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेल्यांनी नवरात्रोत्सव व दिवाळी हा सण कुटुंबियाांह साजरा करण्याचे नियोजन आखले आहे. परंतु घर गाठण्यासाठी रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळत नसल्याने घरी कसे जावे, हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव व अमरावतीत मोठ्या संख्येने बंगाली कुटुंब वास्तव्यास आहेत. दरवर्षी नवदुर्गाेत्सवनिमित्त बंगाली कुटुंबिय हे आप्तस्वकीयांमध्ये जावून हा सण साजरा करतात. मात्र कोलकाता मार्गेे जाण्यासाठी रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळत नसल्याने ही समस्या गंभीर झाली आहे. हावडा मार्गे प्रवास करायचा झाल्यास आरक्षण शिवाय ते करता येत नाहीे. तर दुसरीकडे रेल्वे गाड्यांचे आरक्षण कसे मिळवावे ही चिंता प्रवाशांना सतावू लागली आहे. रेल्वे स्थानकावर आरक्षण ‘नो- रू म’ तर इंटरनेट रेल्वे तिकिट मिळेना, अशी विदारक परिस्थिती आहे. दिवाळीला तब्बल ४० दिवस शिल्लक असताना नोव्हेंबर महिन्यात रेल्वे गाड्यांचे आरक्षण ‘हाऊसफुल्ल’ झाले आहे. मुंबई- हावडा मार्गे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळत नसल्याचे वास्तव आहे.

या गाड्यांचे आरक्षण ‘नो रुम’
मुंबई- हावडा व पुणे-हावडा या प्रमुख लोहमार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळेनासे झाले आहे. यात अमरावती- मुंबई एक्सप्रेस, गोंंिदया- मुंबई (विदर्भ एक्सप्रेस), मुंबई- हावडा (गितांजली), मुंबई- हावडा (मेल), पुणे- नागपूर (गरीब रथ), पुणे- हावडा (सुपर डिलक्स), पुणे- हावडा (समरसता) या लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा समावेश आहे.

‘फेस्टीवल’ स्पेशल धावणार
नवरात्रोत्सव व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाकडून या काळात ‘फेस्टीवल’ विशेष गाड्या सुरु करण्याची शक्यता आहे. त्यानुसार खासदार आनंदराव अडसूळ यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना पत्र दिले आहे. दिवाळीत काही विशेष गाड्या धावतील, अशी माहिती आहे.

हल्ली रेल्वे गाड्यांच्या आरक्षणाची स्थिती गंभीर आहे. विशेषत: हावडा, पुणे व मुंबईकडे ये- जा करणाऱ्या प्रवाशांनी १२० दिवस अगोदरच आरक्षण केल्याचे दिसून येते. वेळेवर प्रवासाचे आरक्षण मिळणे कठीण आहे. .
- व्ही. डी. कुंभारे,
वाणिज्य निरीक्षक, रेल्वे स्थानक

Web Title: Railway 'housefamily' on festive occasions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.