पाच ठिकाणी अवैध दारू विक्रीवर धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:10 IST2021-01-09T04:10:46+5:302021-01-09T04:10:46+5:30

अमरावती : बडनेरा, नांदगावपेठ, खोलापुरी गेट ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी पाच ठिकाणी धाडी टाकून ५ हजार २२८ रुपयांची अवैध दारू ...

Raids on illegal liquor sales in five places | पाच ठिकाणी अवैध दारू विक्रीवर धाडी

पाच ठिकाणी अवैध दारू विक्रीवर धाडी

अमरावती : बडनेरा, नांदगावपेठ, खोलापुरी गेट ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी पाच ठिकाणी धाडी टाकून ५ हजार २२८ रुपयांची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.

बडनेरा पोलिसांनी गुरुवारी दाभा येथे कारवाई करून अविनाश अंबादास कोटांगळे (४१) याच्या ताब्यातून ६६० रुपयांची दारू जप्त केली. बडनेरा पोलिसांनी अकोला नाका येथे कारवाई करून पीयूष साहेबराव कुऱ्हेकर (१९, रा. लोणी, ता. नांदगाव खंडेश्वर) याच्या ताब्यातून १२४८ रुपयांची दारू जप्त केली. नांदगावपेठ पोलिसांनी फत्तेपूर येथे धाड टाकून प्रभाकर महादेव खडसे (६०) याच्या ताब्यातून ३६० रुपयांची अवैध दारू जप्त केली. पोलिसांनी फत्तेपूरच्या धाब्यावर कारवाई करून सिमरजित दर्शनसिंग गरेवाल (२७, रा. शिवणगाव ता. तिवसा) याच्या ताब्यातून ३०० रुपयांची दारू पकडली. खोलापुरीगेट पोलिसांनी म्हाडा कॉलनीतील अंकुश संतोषराव मेश्राम (२०) याच्या ताब्यातून २६६० रुपयांची अवैध दारू जप्त केली. पोेलिसांच्या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Web Title: Raids on illegal liquor sales in five places