मोर्शी येथील दोन व्हिडीओ पार्लरवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:12 IST2021-03-19T04:12:32+5:302021-03-19T04:12:32+5:30

१४ आरोपींना अटक : ४ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त लेहेगाव/मोर्शी : मोर्शी शहरातील दोन व्हिडीओ पार्लरवर धाड घालून ...

Raid on two video parlors in Morshi | मोर्शी येथील दोन व्हिडीओ पार्लरवर धाड

मोर्शी येथील दोन व्हिडीओ पार्लरवर धाड

१४ आरोपींना अटक : ४ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त

लेहेगाव/मोर्शी : मोर्शी शहरातील दोन व्हिडीओ पार्लरवर धाड घालून तब्बल १४ आरोपींना अटक करण्यात आली. एकूण ४ लाख ७३ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. १७ मार्च रोजी ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा व मोर्शी पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांचे एक पथक १७ मार्च रोजी जीपने पेट्रोलिंग करीत असताना त्यांना जयस्तंभ चौकाजवळील आठवडी बाजारात लकी व्हिडीओ पार्लरमध्ये १ ते ८ आकडे असलेल्या इलेक्ट्रॉनिक मशीनवर पैसे लावून हार-जितचा जुगाराचा खेळ खेळला जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून धाड घातली असता, तेथे नऊ आरोपी मिळून आले. आरोपींमध्ये अशोक हिरूळकर (६०, रा. ज्ञानदीप कॉलनी), योगेश बाबाराव बावनकर (५०, रा. विवेकानंद कॉलनी, मोर्शी), महादेव सखाराम नेहारे (३५, रा. मायवाडी), जावेद शाह सिद्दीक शाह (३८, रा. पेठपुरा मोर्शी), युनूस खाँ हुसेन खाँ (४८, रा. पेठपुरा, मोर्शी), सहदेव जमरू धुर्वे (३०, रा. गिट्टी खदान, मोर्शी), सैयद फिरोज सैयद युसूफ (३५), युनूस शाह रज्जाक शाह (३३, रा. रामजीबाबानगर, मोर्शी), नरेश देवराव येरणे (२८, रा. पेठपुरा मोर्शी) यांचा समावेश आहे. त्यांना अटक करून त्यांच्याकडून १३,९०० रुपये रोख, लकी व्हिडीओ पार्लर येथील २ लाख ३० हजार रुपये किमतीच्या १३ इलेक्ट्रॉनिक मशीन असा एकूण २ लाख ४३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

जयभवानी पार्लरवरही कारवाई

मोर्शी शहरातील एका बारच्या बाजूला असलेल्या जयभवानी व्हिडीओ पार्लरमध्ये धाड केली असता, तेथेही इलेक्ट्रॉनिक मशीनवर पैसे लावून हार-जितचा जुगार खेळताना पाच आरोपी मिळून आले. आरोपींमध्ये पवन हरिद्वारसिंह बैस (३६, रा. चांदूर बाजार), अफसर खान राजदार खान (३३, रा. गधेघाटपुरा, मोर्शी), अमर बंडुजी ढोके (४०, रा. सुलतानपुरा, मोर्शी), पुरुषोत्तम दशरथराव महल्ले (४०, रा. गुजरी बाजार, मोर्शी), अब्दुल कादीर अब्दुल कबीर (४२, रा. फरीद कॉलनी, पेठपुरा मोर्शी) यांना अटक करून त्यांच्याकडून १० हजार ९० रुपये रोख, १ ते ८ आकडे लिहिलेल्या एकूण १३ इलेक्ट्रॉनिक मशीन, इन्व्हर्टर , बॅटरी असा एकूण २ लाख ३० हजार ९० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन, अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मोर्शीचे ठाणेदार संजय सोळंके, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शरद भागवतकर, नायक पोलीस कॉन्स्टेबल संदीप वानखडे, कॉन्स्टेबल वैभव देशकर, किरण गावंडे, निखील विघे, पोलीस उपनिरीक्षक सूरज सुसतकर यांनी केली.

पान २ ची लिड

Web Title: Raid on two video parlors in Morshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.