शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सावकारांवर सात ठिकाणी धाडी, माजी नगरसेवकाचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 13:14 IST

‘सहकार’ विभागाचे धाडसत्र, अवैध सावकारी संदर्भात कागदपत्रे सील, सात पथकांची कारवाई

अमरावती : अवैध सावकारी संदर्भात प्राप्त तक्रारीच्या आधारे सहकार विभागाच्या सात पथकाने शहरात मंगळवारी सात ठिकाणी धाडसत्र राबविले. यामध्ये माजी नगरसेवक श्रीचंद तेजवानी यांचे दोन दुकान व घराचा समावेश आहे. याशिवाय अन्य चार ठिकाणी छापे मारून अवैध सावकारी संदर्भात कागदपत्रे जप्त केली आहेत.

पथकाद्वारा तेजवानी यांच्या दोन मोबाइल शॉपी आणि रामपुरी कॅम्प येथील घर, कांचन पंकज बजोरिया (जेल रोड), किशोर मोहनलाल छाबडा (कंवरनगर), सुनील सुरेश देशमुख (चपराशीपुरा) व प्रमोेद मधुकर क्षीरे (विजय कॉलनी) या ठिकाणी पथकांनी धाडसत्र राबविले. यामध्ये कोरे धनादेश, मुद्रांक, करारनामा यासह अन्य कागदपत्र सील करण्यात आली. राजेश भुयार (सहाय्यक निबंधक, मोर्शी ), गजानन डावरे (धामणगाव रेल्वे), अच्युत उल्हे (अमरावती), कीर्ती धामणे(तिवसा), कल्पना धोपे (वरुड), राजेश यादव (अंजनगाव) व किशोर बलिंगे (दर्यापूर) या प्रमुख प्रमुखांनी ही कारवाई केल्याचे सहकार अधिकारी सुधीर मानकर यांनी सांगितले.

सहकार विभागाचे माहितीनुसार महाराष्ट्र सावकारी (नियमन)अधिनियम २०१४ मदील तरतुदीनुसार जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी प्राप्त तक्रारीच्या आधारे सात सहाय्यक निबंधकांचे सात पथके तयार केली. प्रत्येक पथकात चार कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या पथकांनी शहरातील राजापेठ, कोतवाली, गाडगेनगर, खोलापुरी गेट व फ्रेझरपूरा ठाण्या अंतर्गत सात ठिकाणी हे धाडसत्र राबविले.

एकाही जवळ सावकारीचा परवाना नाही

सहकार विभागाने मंगळवारी केलेल्या छापेमारीतील एकाही व्यक्तींकडे सावकारीचा अधिकृत परवाना नाही. या कारवाईदरम्यान मिळालेली कागदपत्रे सील करण्यात आली आहेत. यानंतर सुनावणी होईल. यामध्ये संबंधित व्यक्ती अवैध सावकारी करीत असल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कारवाई केल्या जाणार आहे.

आतापर्यंत ६१ छापे २९ एफआयआर

महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या अंमलबजावणी पासून जिल्ह्यात अवैध सावकारी विरोधात ६१ ठिकाणी धाडसत्र राबविण्यात आलेले आहे. यामध्ये २९ एफआयआरमध्ये ३४ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे. या शिवाय काही प्रकरणात चौकशी सुरु असल्याचे सहकार विभागाने सांगितले.

सात पथकांद्वारा सात ठिकाणी कारवाई करण्यात आली. यामध्ये काही धनादेश, मुद्रांक आदी मिळाले आहेत. नागरिकांनी निर्भिडपणे, पुराव्यासह तक्रार करावी, त्यावर कारवाई करण्यात येईल.

- शंकर कुंभार, जिल्हा उपनिबंधक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीraidधाडAmravatiअमरावती