शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

आकोली मार्गावरील साहू ले-आऊटमधील कुंटणखान्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:00 IST

साईनगर ते अकोली मार्गालगत साहू ले-आऊटमधील एका घरात कुंटणखाना चालविला जात होता.  त्यामुळे परीसरातील नागरिक त्रस्त झाले होते. ज्या घरात कुंटणखाणा सुरू होता, ते घर खोलापुरी गेट व बडनेरा पोलीस ठाण्याच्या सीमेवर येत असल्यामुळे परिसरातील  नागरिक तक्रार द्यायची कुणाला, या विचारात होते. यादरम्यान परिसरात सातत्याने वेगवेगळे युवक दुचाकीने येत असे. काही दिवसांपूर्वी महिलांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रारदेखील केली होती.

ठळक मुद्देमहिलेसह युवकाला अटक, दोन युवती पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आकोली मार्गावरील  खंडेलवाल नगरातील साहू ले-आउटमध्ये काही महिन्यांपासून सुरू असलेल्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून महिलेसह दोन युवती व एका युवकाला ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली. आरोपी वैभव ओंकार ढेले (२३, रा. खेर्डा, ता. कारंजा लाड, जि. वाशिम) व एका महिलेविरुद्ध बडनेरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला.साईनगर ते अकोली मार्गालगत साहू ले-आऊटमधील एका घरात कुंटणखाना चालविला जात होता.  त्यामुळे परीसरातील नागरिक त्रस्त झाले होते. ज्या घरात कुंटणखाणा सुरू होता, ते घर खोलापुरी गेट व बडनेरा पोलीस ठाण्याच्या सीमेवर येत असल्यामुळे परिसरातील  नागरिक तक्रार द्यायची कुणाला, या विचारात होते. यादरम्यान परिसरात सातत्याने वेगवेगळे युवक दुचाकीने येत असे. काही दिवसांपूर्वी महिलांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रारदेखील केली होती. त्याआधारे पोलिसांनी गुरुवारी रात्री ९ वाजता धाड टाकून वैभवसह २७ वर्षीय महिला आणि २१ व २२ वर्षीय युवतींना ताब्यात घेतले. आरोपींना ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली, तर युवतींना नागपूर येथील पुनर्वसन केंद्रात पाठविण्यात आले.    ही कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर, सायबरच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर व त्यांच्या पथकाने केली.

आरोपीकडून दोन मोबाईल जप्तपोलिसांनी वैभव ढेले याच्याकडून २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल तसेच रोख तीन हजार असा एकूण २३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सदर पुरुष व महिला आरोपीने युवतींकडून वेश्याव्यवसाय करून घेण्याकरिता या ठिकाणी भाड्याने रूम  केली होती.

बनावट ग्राहक पाठवून घेतले ताब्यातआरोपी महिला बाहेरून मुलींना आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी दोन बनावट ग्राहक पाठवून त्यांच्याजवळ ५०० रुपयांच्या प्रत्येकी सहा नोटा देण्यात आल्या. ही रक्कम कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेस दिल्यानंतर त्यांना दोन युवती पुरविण्यात आल्या. यानंतर आधीच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी धाड टाकली. दोन मुली त्यांना रूममध्ये मिळून आल्या. या घटनेेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

 

टॅग्स :raidधाडPoliceपोलिस