दर्यापुरात गुटख्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:00 IST2020-04-28T05:00:00+5:302020-04-28T05:00:11+5:30
शनिवार, २५ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास चंद्रभागा नदीकाठी दोघे अवैध गांजा विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी घटनास्थळावर धाड टाकून आरोपींकडून ४८५ ग्राम गांजा, १४८० रुपये रोख असा एकूण ५१ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दर्यापुरात गुटख्यावर धाड
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : 'लॉकडाऊन' व संचारबंदीच्या गावरानी दारू, गुटखा व गांजाची विक्री वाढल्याचे दिसून येत आहे. देशी-विदेशी दारू बंद असल्याने हातभट्टीची दारू चढ्या दराने विकली जात असताना गुटखा पुड्याही चोरून लपून विक्री केल्या जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
शनिवार, २५ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास चंद्रभागा नदीकाठी दोघे अवैध गांजा विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी घटनास्थळावर धाड टाकून आरोपींकडून ४८५ ग्राम गांजा, १४८० रुपये रोख असा एकूण ५१ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी मंगेश डाहे व साहेबराव इंगळे (दोघेही रा. दर्यापूर) यांना अटक करण्यात आली. तसेच शहरातील वाकोडेपुरा बाभळी येथे आरोपी संदीप ठाकूर, रफिक घाणीवाले हे प्रतिबंधित गुटखा विकत असताना पोलिसांनी त्याला रंगेहात ताब्यात घेतले. त्यांचेकडून ३० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई दर्यापूरचे ठाणेदार तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रविकिरण खंडारे, पीएसआय शुभांगी ठाकरे, पीएसआय प्रिया उमाळे, प्रशांत धोके, रवी तायडे, गजानन शिंदे, विनोद पवार, नवनाथ खेडकर, सागर नाठे, सौरभ धरमठोक, रशिदा बानो, शीतल जाधव, शरद सारसे यांनी केली.