गवळीपुरातील जुगारावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:27 IST2021-09-02T04:27:15+5:302021-09-02T04:27:15+5:30
अमरावती : पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या विशेष पथकाने धाड घालून तीन ठिकाणचे जुगार अड्डे उद्ध्वस्त केले. २९ ...

गवळीपुरातील जुगारावर धाड
अमरावती : पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या विशेष पथकाने धाड घालून तीन ठिकाणचे जुगार अड्डे उद्ध्वस्त केले. २९ ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली.
नागपूर गेट हद्दीतील गवळीपुरा येथे जमीर शेख यांच्या घरासमोर जुगार रेड केली असता तेथे चार इसम जुगार खेळताना मिळून आले. तेथून सुधीर रामटेके (५० रा. बेलपुरा), सुरेश तायवाडे (४०, रा. महाजनपुरा), राहुल इंगळे (२०, रा. शेगाव नाका), नरेंद्र श्रीवास (६० रा. रतनगंज) यांच्याकडून नगदी व जुगार साहित्य असा एकूण ३,६२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक सोनुने, सुरज चव्हाण, सुरज मेश्राम, राजिक, निखील गेडाम या पथकाने ही कारवाई केली.