लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : पोलिसांनी १५ ऑगस्टच्या सायंकाळी ७.१५ च्या सुमारास दहिगाव धावडे येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून तिघांना पकडले. त्यांच्याकडून १,८१० रुपयांसह मुद्देमाल जप्त केला. चांदूर रेल्वे शहरात रात्री ११.३० वाजता इंदिरानगरात धाड टाकून सहा व्यक्तींना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून ४,२९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.चांदूर रेल्वे तालुक्यातील दहेगाव धावडे येथे १५ ऑगस्ट रोजी रात्री देवानंद दत्तात्रय गवई (३५), श्रीकृष्ण शिरपतराव बागेकर (५०) व सुरेश तुकाराम खडसे (४०) यांना जुगार खेळताना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून जुगार साहित्य जप्त करून मुंबई जुगार कायदा १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला. चांदूर रेल्वे शहरात त्याच रात्री ११.३० वाजता इंदिरानगरात जुगार खेळताना सचिन देशमुख, रुपेश धने, शेख तौफिक, शुभम तायवाडे, संजय तांडेकर व शिवम वाधवानी यांना पकडून ४,२९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या दोन्ही कारवाईत पीएसआय आर. जी. चौधरी, पीएसआय मुपडे, पोलीस जमादार अविनाश गिरी, शेख गणी, अमर काळे, प्रफुल्ल माळोदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
चांदूर रेल्वे तालुक्यात जुगार अड्ड्यांवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:00 IST
दहिगाव धावडे येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून तिघांना पकडले. त्यांच्याकडून १,८१० रुपयांसह मुद्देमाल जप्त केला. चांदूर रेल्वे शहरात रात्री ११.३० वाजता इंदिरानगरात धाड टाकून सहा व्यक्तींना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून ४,२९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
चांदूर रेल्वे तालुक्यात जुगार अड्ड्यांवर धाड
ठळक मुद्देनऊ जण ताब्यात : साहित्य जप्त