बडनेऱ्यात राणा-खोडके समर्थकांत राडा
By Admin | Updated: October 15, 2014 23:12 IST2014-10-15T23:12:31+5:302014-10-15T23:12:31+5:30
बडनेरा मतदारसंघात रवी राणा व सुलभा खोडके समर्थक एकमेकांसमोर आल्याने शाब्दिक चकमक उडून गोंधळ उडाला. यामुळे या मतदारसंघात तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपाने

बडनेऱ्यात राणा-खोडके समर्थकांत राडा
बडनेरा/अमरावती : बडनेरा मतदारसंघात रवी राणा व सुलभा खोडके समर्थक एकमेकांसमोर आल्याने शाब्दिक चकमक उडून गोंधळ उडाला. यामुळे या मतदारसंघात तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपाने वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
बडनेऱ्यातील जुनीवस्ती स्थित भगतसिंग चौकातील मतदान केंद्राजवळ दुपारी २.३० वाजतादरम्यान रवी राणा पोहोचले. याचवेळी तेथून महापौर रिना नंदा यांचे दीर लाली नंदा मतदान केंद्राहून परत जात होते. यावेळी राणा व लाली नंदा समोरासमोर येताच दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जाणार, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र वेळेवर मतदान केंद्रावरील पोलिसांनी हस्तक्षेप करुन वाद मिटविण्याचा प्रयत्न केला आणि गर्दीला पांगविले. राणा व लाली नंदा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार घेऊन गेले होते. बडनेरा ठाण्यात सुमारे ५०० कार्यकर्त्यांचा जमाव झाला. मात्र राणा व लाली नंदा यांनी पोलिसांत तक्रारच दिली नसल्याची माहिती आहे.