समृद्ध भारताच्या ऐक्यासाठी दौड

By Admin | Updated: November 1, 2014 01:25 IST2014-11-01T01:25:06+5:302014-11-01T01:25:06+5:30

देशाचे माजी उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त शुक्रवारी अमरावती ...

Race for the unity of rich India | समृद्ध भारताच्या ऐक्यासाठी दौड

समृद्ध भारताच्या ऐक्यासाठी दौड

अमरावती : देशाचे माजी उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त शुक्रवारी अमरावती शहरात काढण्यात आलेल्या 'ऐक्यासाठी धाव' या उपक्रमात विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मनपा आयुक्त अरूण डोंगरे, पोलीस आयुक्त सुरेश मेकला, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्यासह हजारोंच्या संख्येनी युवक-युवती, अधिकारी, कर्मचारी, नागरिक उत्स्फूर्तपणे धावले.
विभागीय क्रीडा संकूल येथे अविनाश मोहरील यांनी एकता दौडचे महत्व सांगितले. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी उपस्थितांना एकात्मतेची शपथ दिली. जिल्हाधिकारी किरण गित्ते, मनपा आयुक्त अरूण डोंगरे, पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनी हिरवी झेंडी दाखवून सकाळी ८ वाजता स्टेडियमपासून एकता दौड प्रारंभ झाली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग
अमरावती : ही दौड स्टेडियम-इर्वीन -जयस्तंभ-राजकमल चौक-रेल्वे स्टेशन-इर्वीन चौक मार्गे स्टेडियम येथे आल्यानंतर तेथे सामुदायिक राष्ट्रगीत झाले आणि एकता दौडचा समारोप झाला. साधारण तीन किलोमीटर अंतराच्या या दौडमध्ये जिल्ह्यातील छत्रपती पुरस्कार विजेते, राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धात प्राविण्य मिळविलेले खेळाडू, जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. याशिवाय राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना, शारीरिक शिक्षण महाविद्यालय, स्थानिक महाविद्यालयाचे युवक-युवती, नवोदय विद्यालय, नेहरू युवा केंद्र, क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी, माजी सैनिक, शहरातील हनुमान व्यायाम शाळेचे सदस्य व पदाधिकारी सहभागी झाले होते.
उत्स्फूर्त सहभाग
एकात्मता दौडमध्ये सहाय्यक आयुक्त चिमाजी, उपायुक्त ठाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार, जिल्हा शल्य चिकित्सक राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी वानखडे, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, तहसीलदार सुरेश बगळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र धुरजड, वनपरिक्षेत्र अधिकारी लकडे, प्राचार्य अविनाश मोहरील, जिल्हा क्रीडा अधिकारी पुंड, शहरातील जिल्हा प्रशासनातील अधिकारी, मनपा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन, विविध बँका, महामंडळाचे प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शहरातील विविध महाविद्यालयाचे युवक-युवती, एन. सी. सी., एन. एस. एस., स्काऊट गाईड, ज्ञानमाता विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी, ११ महाराष्ट्र बटालियन अकोला, पोलीस प्रशिक्षणार्थी, विविध स्वयंसेवी संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी, हनुमान व्यायाम शाळेचे सदस्य व पदाधिकारी, शहरातील नागरिकांनी सहभाग घेऊन राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविले.

Web Title: Race for the unity of rich India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.