रबीचा हंगामही महिनाभराने माघारला
By Admin | Updated: November 1, 2014 22:42 IST2014-11-01T22:42:48+5:302014-11-01T22:42:48+5:30
जून महिन्यापासून दीड महिना उशिराने झालेली खरीपाची पेरणी यामुळे खरिपाचा हंगाम नोव्हेंबर २०१४ पर्यंत माघारला. परिणामी हंगाम देखील लांबणीवर पडला आहे. जमिनीत आर्द्रता कमी असल्याने रबीचे हजारो

रबीचा हंगामही महिनाभराने माघारला
सरासरी टक्केवारी सहा : खरिपाच्या उशिरा पेरणीचा परिणाम
गजानन मोहोड - अमरावती
जून महिन्यापासून दीड महिना उशिराने झालेली खरीपाची पेरणी यामुळे खरिपाचा हंगाम नोव्हेंबर २०१४ पर्यंत माघारला. परिणामी हंगाम देखील लांबणीवर पडला आहे. जमिनीत आर्द्रता कमी असल्याने रबीचे हजारो हेक्टर क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता आहे. आधिच एक महिना उशिराने सुरु होत असलेल्या रबी हंगामात केवळ सहा टक्केच पेरणी झालेली आहे. यामध्ये गहू पिकाचे केवळ १४ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
यंदाच्या खरीप हंगामात जून महिन्यापासून पावसाने दडी मारली. त्यानंतरही पावसात खंड यामुळे आॅगस्ट महिना अखेरपर्यंत खरीपाची पेरणी सुरु होती. साधरणपणे दीड ते दोन महिने उशीरा पेरणी झाल्यामुळे खरीपाचा हंगाम लांबणीवर पडला. सोयाबीनची मळणी आता सुरु आहे. त्यानंतर शेताची मशागत आदी प्रक्रिया आटोपण्यासाठी किमान महिना भराचा अवधी लागणार आहे. परिणामी रबी हंगामाची पेरणी देखील नोव्हेंबर अखेर सुुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रबीचा हंगाम नियोजित कालावधीपेक्षा दीड महिना उशीराने सुरु होणार आहे. जिल्ह्यात खरीप २०१४ हंगामासाठी १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर सरासरी पेरणी क्षेत्र आहे. यामध्ये दि. ३१ आॅक्टोबरपर्यंत केवळ ९ हजार ४६६ हेक्टरवर पेरणी झाली. यापैकी ९ हजार ४५२ हेक्टर हरभरा व १४ हेक्टरमध्ये गव्हाची पेरणी झाली.