खासगी सुरक्षा रक्षकांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह
By Admin | Updated: August 30, 2014 01:06 IST2014-08-30T01:06:14+5:302014-08-30T01:06:14+5:30
व्यक्ती किंवा मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी मोठ्या शिताफीने सांभाळणाऱ्या खासगी सुरक्षा रक्षकांची त्यांच्या ‘सिक्युरिटी’ कंपनीकडूनच ...

खासगी सुरक्षा रक्षकांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह
अमरावती : व्यक्ती किंवा मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी मोठ्या शिताफीने सांभाळणाऱ्या खासगी सुरक्षा रक्षकांची त्यांच्या ‘सिक्युरिटी’ कंपनीकडूनच पिळवणूक होत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. वेतन जास्त ठरवायचे मात्र; हाती अधीच रक्कम टिकवायची हा नवा फंडा कंपन्यांनी चालविला आहे.
सरकारी व निमसरकारी कार्यालये, वसाहती, अपार्टमेंट, संकु ले आदी ठिकाणी खासगी सुरक्षा रक्षकांच्या हाती संरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात येते. सिक्युरिटी कंपनीशी रितसर करार करुन त्या - त्या ठिकाणी खासगी सुरक्षा रक्षक नेमले जातात. मात्र मालमत्तेचे अथवा व्यक्तीचे संरक्षण करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या खासगी सुरक्षा रक्षकांच्या कर्तव्याचा मोबदला म्हणून सिक्युरिटी कंपन्या अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम वसूल करतात. परंतु सुरक्षा रक्षकांच्या हाती अर्धीच रक्कम टिकवतात. हाताला दुसरा रोजगार मिळत नसल्याने सुरक्षा रक्षक हे सिक्युरिटी कंपन्यांचे कारनामे निमूटपणे सहन करीत असल्याचे वास्तव आहे. खासगी सुरक्षा रक्षकांच्या पिळवणुकीचा प्रकार महापालिका, औद्योगिक वसाहत, शाळा, महाविद्यालये, बँक, हॉटेल, प्रतिष्ठाने आदींमध्ये मोठ्या प्रमाणत होत आहे. महापालिकेत कंत्राटी पद्धतीने खासगी सुरक्षारक्षक नेमले गेले आहेत. मागील पाच वर्षांपासून एकाही सुरक्षारक्षकांचे कामगार आयुक्त कार्यायलाने ठरवून दिलेल्या नियमानुसार वेतन, भविष्य निर्वाह निधीची कपात , एटीएमने वेतन आदी बाबी पूर्णत्वास आल्या नाहीत. दर महिन्याला ८ ते १० हजार रुपये रक्कम वेतन सुरक्षारक्षकाला कागदोपत्री दिले जात असल्याचे दाखविले जात आहे. मात्र हाती ३५०० ते ५ हजार रुपये टिकवायचे. हा गोरखधंदा सुरु आहे. खासगी सुरक्षा रक्षकाच्या श्रमाचा मोबदला सिक्युरिटी कंपन्याच गिळंकृत करीत आहेत. त्यांच्या कुटुंबांची अतिशय हलाखीची परिस्थिती असून उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरमहिन्याला किमान सहा ते सात हजार रुपये हाती मिळावे, ही अपेक्षा त्यांची आहे. सिक्युरिटी कंपन्यांविरुद्ध आवाज उठविला तर हातून रोजगार जातो, अशी स्थिती त्यांची झाली आहे.