एसआरपीएफ जवानांच्या घरांचा प्रश्न निकाली
By Admin | Updated: April 2, 2017 00:09 IST2017-04-02T00:09:14+5:302017-04-02T00:09:14+5:30
येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या वसाहतीतील १८० घरांसाठी व अंतर्गत रस्त्यांसाठी ११ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

एसआरपीएफ जवानांच्या घरांचा प्रश्न निकाली
पालकमंत्र्यांचे प्रयत्न : १८० घरांसाठी ११ कोटी मंजूर
अमरावती : येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या वसाहतीतील १८० घरांसाठी व अंतर्गत रस्त्यांसाठी ११ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. याविषयी २७ मार्च रोजी शासनाने निर्देश दिलेला आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या जवानांना शासकीय निवासाचा लाभ मिळविता येणार आहे. राज्य राखीव पोलीस बलाच्या वसाहतीत राज्य राखीव पोलीस बलाच्या वसाहतीत १९८४ मध्ये ५०० निवासस्थाने बांधली होती.
कालातंराने येथील अनेक निवासस्थाने मोडकळीस आल्यामुळे पोलीस जवानांना राहण्यास अडचणी येत होत्या. परंतु पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडे संबंधित विभागाने मागणी करून वेळोवेळी सदर समस्येचा पाठपुरावा केल्यामुळे पालकमंत्र्यांनीदेखील ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे त्यांनी राज्य राखीव पोलीस बलाच्या वसाहतीतील टाईप-"अ" प्रकारातील १०० घरे व टाईप-ब प्रकारातील ९० घरांचे नविनीकरण करण्यात येणार आहे. अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी ९५ लक्ष रुपयांचा निधीला मान्यता मिळाली आहे.
निधीला मंजुरात मिळाल्यामुळे समादेशक जे.बी. डाखोरे, सहाय्यक समादेशक एन. सोंळखे, राहुल दाते, विपुल घाटोळ यांच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे आभार मानले आहे. (प्रतिनिधी)
नवसारी-रहाटगाव रस्त्यासाठी ९१ कोटी
अमरावतीतील नवसारीपासून रहाटगाव टी पॉइंटपर्यंत रस्याच्या बांधकामासाठी शासनाने ९०.७२ कोटी रुपयांचा निधी "हॅब्रिड अॅन्युटी" धोरणाअंतर्गत मंजूर केला आहे. सदर मार्गाची लांबी २१.५० कीलोमीटर असून सदर कामासाठी प्रकल्प सल्लागाराची नेमणूकसुध्दा करण्यात आली आहे. प्रकल्प सल्लागाराकडून अहवाल प्राप्त होताच मुख्य कामाला सुरुवात होणार आहे. सदरहू मार्गावरुन राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर व राष्ट्रीय महामार्गावरून अचलपूरकडे मोठ्या प्रमाणात वाहने जातात त्यामुळे या मागार्ची निवड सार्वजनिक बांधकाम विभागाने "हॅब्रिड अॅन्युटी" धोरणाच्या अंतर्गत केली आहे.