देशी दारु दुकानाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; वडाळीत होणार मतदान!

By Admin | Updated: November 17, 2014 22:43 IST2014-11-17T22:43:23+5:302014-11-17T22:43:23+5:30

वडाळी येथील सध्या बंद असलेल्या देशी दारु दुकानासंदर्भात नव्याने मतदान घेतले जाईल. आता बाटली आडवी की उभी? हे प्रशासन सिद्ध करणार असून त्यानंतर या दुकानाबाबत निर्णय घेतला जाईल.

The question of the country's ammunition shop reverts; Polling will be held in Wadali! | देशी दारु दुकानाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; वडाळीत होणार मतदान!

देशी दारु दुकानाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; वडाळीत होणार मतदान!

गणेश वासनिक - अमरावती
वडाळी येथील सध्या बंद असलेल्या देशी दारु दुकानासंदर्भात नव्याने मतदान घेतले जाईल. आता बाटली आडवी की उभी? हे प्रशासन सिद्ध करणार असून त्यानंतर या दुकानाबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र, हे दारुचे दुकान सुरूच होऊ नये, असा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.
वडाळी येथे झांबानी यांचे परवाना प्राप्त देशी दारु विक्रीचे दुकान आहे. मात्र, या दुकानामुळे कायदा, सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. महिला, युवती दुकानामुळे असुरक्षित असल्याची तक्रार देण्यात आली होती. त्यामुळे हे दुकान वडाळीतून कायमस्वरुपी हद्दपार करावे, अशी मागणी महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार १६ फे ब्रुवारी २०१४ रोजी मतदान घेण्यात आले. मात्र, मतदार यादीत घोळ असल्याने महिला मतदारांची नावे यादीत नव्हती. परिणामी ही मतदान प्रक्रिया दारु विक्रेत्याच्या इशाऱ्यावर ‘मॅनेज’ करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला होता. ही मतदान प्रक्रिया नकोच, दुकानही सुरु होता कामा नये, अशी ठाम भूमिका घेत त्यावेळी वडाळीतील महिलाशक्ती एकवटली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी पुढील आदेशापर्यत देशी दारुविक्रीचे दुकान सुरु करता येणार नाही, असा निर्णय घेतला होता. मात्र, ९ महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर या दुकानासंदर्भात योग्य निर्णय घ्यावा, असा अर्ज देशी दारु विक्रीचे परवानाधारक झांबानी यांनी राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाकडे केला आहे. विभागाला तसे पत्रसुद्धा मिळाले आहे. शासनाच्या पत्राची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयातही पोहोचली आहे. दारू दुकानाबाबतची प्रक्रिया नियमानुसार करावी लागणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या दुकानासंदर्भात नव्याने मतदान घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
वडाळीत यापूर्वी मतदार यादीवरुन उठलेले वादळ पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने विधानसभा निवडणुकीत प्रसिद्ध मतदार यादीबाबतचे आक्षेप नोंदविण्याचे आवाहन केले होते.
महिलांच्या हाती निर्णय
वडाळीतील एकाही मतदाराने हरकत दाखल केली नाही. त्यामुळे आता या दुकानाबाबत मतदान घ्यायचे झाल्यास विधानसभा निवडणुकीत मतदार यादीनुसार पार पाडले जाईल, अशी माहिती आहे. चार हजार महिला मतदार असलेल्या यादीनुसार पुढील मतदान प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे दारू दुकानासंदर्भात यापूर्वी एकदा मतदान झाले. आता नव्याने मतदान होईल. मात्र, वडाळीत बाटली आडवी की उभी? हा निर्णय महिलांच्या हाती राहणार आहे. देशी दारु विक्रेता परवानाधारक शासन, प्रशासन स्तरावर सर्वच घटनाक्रम आपल्या बाजूने कसे होईल, याचे सुक्ष्म नियोजन करीत आहेत. परंतु ज्या हक्कासाठी महिला एकवटल्या आहेत.

Web Title: The question of the country's ammunition shop reverts; Polling will be held in Wadali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.