राष्ट्रसंत पुण्यतिथी महोत्सवात कव्वालीचा नजराणा

By Admin | Updated: October 19, 2016 00:29 IST2016-10-19T00:29:05+5:302016-10-19T00:29:05+5:30

४८ व्या पुण्यतिथी महोत्सवात प्रथमच शेख रऊफ गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य गायक फिरोज खान सुफी, डॉ.मोहम्मद फैय्यज सुफी, सुफी ब्रदर्स, अकोला यांच्या कव्वाली गायनाचा कार्यक्रम झाला.

Qawwali's specialty at Rashtrasantya Punyathithi Festival | राष्ट्रसंत पुण्यतिथी महोत्सवात कव्वालीचा नजराणा

राष्ट्रसंत पुण्यतिथी महोत्सवात कव्वालीचा नजराणा

उत्स्फूर्त प्रतिसाद : सुफी गायकांचा सहभाग
गुरूकुंज मोझरी : ४८ व्या पुण्यतिथी महोत्सवात प्रथमच शेख रऊफ गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य गायक फिरोज खान सुफी, डॉ.मोहम्मद फैय्यज सुफी, सुफी ब्रदर्स, अकोला यांच्या कव्वाली गायनाचा कार्यक्रम झाला. अशा प्रकारचा कार्यक्रम प्रथमच होत असल्यामुळे परिसरातील गावातील श्रोत्यांनी कव्वालीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून चांगला प्रतिसाद दिला. ‘मस्जिद में भी खुदा, मंदिर मे भी राम है, दोनों भी नही पत्थरों में, सिर्फ उनका नाम है. अल्लाह का वही रूप है, ओंकार का जो स्वरुप है... नाम चाहे जो दे दोनों का बिस्तर एक है’ या कव्वालीने कार्यक्रमाची सुरूवात करताच उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि त्यानंतर सुफी ब्रदर्स यांनी छोड दिया यह भार सभी गुरूदेव तुम्हारे चरणों में या भजनाला कव्वालीच्या स्वरुपात गाऊन उपस्थितांची वाहवा मिळविली. ‘राष्ट्रध्वज को बचाना ही सद्धर्म है, इसमें झगडे मचाना बडी शर्म है’ ‘दिखादो नजरसे वह जलवा तुम्हारा’, तुने तो हमें ख्वाजा दिवाना बना डाला, बात से जाना तो क्या.. राष्ट्रीयत्वाची कव्वाली त्यांनी गायिली. या कव्वाली गायनाला साथसंगत कादिर अहमद चिस्ती, अमिर खान, मोहम्मद कैसर, शेख रमिज राजा, सय्यद अफजल, इम्रान काजी, शेख मोहम्मद, सय्यद रियाज, शेख अब्रार, शिवाजी पाटील, कुलदीप म्हैसने यांनी केली.

झीरो बजेट शेती, ग्रामगीताचार्य पदवीदान
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती बेभरवशाची झाली आहे. शेतीकरणाचा खर्च वाढला असून, उत्पादनाला मात्र त्यानुसार भाव मिळत नाही. त्यामुळे शेती घाट्याची झाली असून, अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे कमी खर्चात शेती कशी करावी, या विषयाचे संपूर्ण मार्गदर्शन पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी ७.२५ ते ८.३० या वेळेत करणार आहेत. ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभागाच्यावतीने यावर्षी ग्रामगीताचार्य परीक्षेचा पदवीदान सोहळा सकाळी ९ ते ५ या वेळेत पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरू सिद्धार्थ काने करतील. रात्री ८.३० वाजता हरिशास्त्री पालवे व १० वाजता डॉ. उद्धवराव गाडेकर यांचे कीर्तन होईल.

Web Title: Qawwali's specialty at Rashtrasantya Punyathithi Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.