विदर्भ मिल येथे पुतण्याची काकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:13 IST2021-03-18T04:13:55+5:302021-03-18T04:13:55+5:30
--------- पाणीपुरवठ्यावरून कर्मचाऱ्याला मारहाण ब्राह्मणवाडा थडी : देऊरवाडा येथील गुजरी बाजार परिसरातील राजेंद्र सुखदेवराव निमकर (४५) याने नळाला पाणी ...

विदर्भ मिल येथे पुतण्याची काकाला मारहाण
---------
पाणीपुरवठ्यावरून कर्मचाऱ्याला मारहाण
ब्राह्मणवाडा थडी : देऊरवाडा येथील गुजरी बाजार परिसरातील राजेंद्र सुखदेवराव निमकर (४५) याने नळाला पाणी येत नसल्याचे सांगत वैभव आमझरे या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला घरापुढे काठीने मारहाण केली. शिरजगाव कसबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
---------
विश्रोळी येथून दुचाकी लंपास
राजुरा बाजार : विश्रोळी येथीव विजय आनंदराव आवारे (५०) यांची शेतात उभी केलेली दुचाकी १२ मार्च रोजी अज्ञात चोरट्याने लंपास केली. त्यांनी ब्राह्मणवाडा थडी पोलिसांत १६ मार्च रोजी तक्रार दाखल केली.
-----------
शिरपूर येथे मुलाचा वृद्धावर विळ्याने वार
शिवणी रसुलापूर : नजीकच्या शिरपूर येथे मुलाला घरातून निघून जाण्यास सांगणाऱ्या वृद्धाच्या हातावर विळ्याने वार करण्यात आला. २६ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. १६ मार्च रोजी नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
---------
हिवरखेड येथे विवाहितेचा छळ
मोर्शी : मूल होत नसल्याच्या कारणावरून छळ होत असल्याची तक्रार हिवरखेड येथील ३३ वर्षीय विवाहितेने मोर्शी पोलीस ठाण्यात दिली. पती चंद्रशेखर सहदेव सावळे (४०) व एक महिला यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.