गोभक्त मुस्लिम बांधवाला ठेवले दोन तास डांबून
By Admin | Updated: August 18, 2014 23:15 IST2014-08-18T23:15:03+5:302014-08-18T23:15:03+5:30
मध्यप्रदेश पोलिसांना सूचना देऊन १५ गायी पकडून दिल्याचा आरोप करीत एका गोभक्त मुस्लिम युवकावर हल्ला चढवून त्याला डांबून ठेवणाऱ्याविरुद्ध धारणी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आल्याने

गोभक्त मुस्लिम बांधवाला ठेवले दोन तास डांबून
धारणी : मध्यप्रदेश पोलिसांना सूचना देऊन १५ गायी पकडून दिल्याचा आरोप करीत एका गोभक्त मुस्लिम युवकावर हल्ला चढवून त्याला डांबून ठेवणाऱ्याविरुद्ध धारणी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली.
याप्रकरणी शौकत उल्ला अमान उल्ला याने धारणी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार अडाखेडा या मध्यप्रदेशातील गावातील शेतमजूर त्याच्याकडे कामावर आहेत. यातील काही मजुर घरगुती कामासाठी गावी गेल्याने त्यांना शोधण्यासाठी शौकत हा १० आॅगस्ट रोजी मध्यप्रदेशात गेला होता. त्याला मार्गात धारणीतील दोन बँकांचे व्यापारी पोलिसांसह दिसले. त्यात शेख कबीर शेख रज्जाक कुरैशी वार्ड नं.६ व शेख फहीम याचा समावेश होता. १३ आॅगस्ट रोजी दोन्ही आरोपींनी शौकत उल्ला यांना सिनेमा थिएटरच्या मागे नेले आणि १५ गायी मध्यप्रदेश पोलिसांना सूचना देऊन पकडून दिल्याचा आरोप करून त्यांच्यावर काठीने हल्ला चढविला. यात ते गंभीर जखमी झाले. आरोपींपासून बचाव करण्यासाठी फिर्यादीने नजीकच्या रफीक कुरैशी याच्या घरात शिरून स्वत:चा बचाव केला व संरक्षण मिळविले. दरम्यान गावातील आणखी आठ ते दहा लोक मोळा झाले. त्यांनी शौकत उल्ला लपून बसलेल्या घराला बाहेरुन कुलूप लावले. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु तोपर्यंत आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला. (तालुका प्रतिनिधी)