बाजार समितीच्या कारभाराचे होणार शुद्धीकरण
By Admin | Updated: January 3, 2015 22:53 IST2015-01-03T22:53:09+5:302015-01-03T22:53:09+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अनागोंदी कारभाराचा पंचनामा करण्यासाठी शनिवारी आ. सुनील देशमुख यांनी पाहणी दौरा केला. यावेळी व्यापारी, अडते, बाजार समितीचे प्रशासक, सचिव

बाजार समितीच्या कारभाराचे होणार शुद्धीकरण
अमरावती : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अनागोंदी कारभाराचा पंचनामा करण्यासाठी शनिवारी आ. सुनील देशमुख यांनी पाहणी दौरा केला. यावेळी व्यापारी, अडते, बाजार समितीचे प्रशासक, सचिव यांच्याशी चर्चा करुन त्यांनी समस्या व प्रश्न जाणून घेतले. बाजार समितीत सुरु असलेल्या अनागोंदी कारभाराचे शुद्धीकरण करण्यासाठी सहकारमंत्र्यांना साकडे घालण्याचा निर्णय देशमुखांनी घेतला आहे.
बाजार समितीत संचालक मंडळाऐवजी प्रशासक नेमून कारभार चालविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अनुषंगाने जुन्या, नवीन बाजार समितीची पाहणी करून आ. देशमुख यांनी समस्या जाणून घेतल्या. जुन्या बाजार समितीत अडते, व्यावसायिकांचे प्रश्न जाणून घेताना प्रशासक, सचिवांच्या कारभारावर आ. देशमुखांनी नाराजी व्यक्त केली. वाहनतळ, शेतमालाची चोरी, सुरक्षा रक्षकांची अकार्यक्षमता अवैध धंदे, रस्ते, सांडपाण्याची समस्या आदींबाबत त्यांनी माहिती घेतली.